Join us

Shipping Stock मध्ये तुफान तेजी, १५ टक्क्यांची वाढ; Budget मध्ये शिपिंग कंपन्यांना मिळू शकते 'गूड न्यूज'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 1:05 PM

Shipping Stocks: अलीकडच्या काळात शिपिंग स्टॉक्समध्येही जबरदस्त वाढ दिसून आली आहे. या कंपनीच्या शेअरनं गुरुवारी ३२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३१७ रुपयांवर झेप घेतली. गुरुवारी हा शेअर २८० रुपयांवर उघडला.

Shipping Stocks: अलीकडच्या काळात शिपिंग स्टॉक्समध्येही (Shipping Stocks) जबरदस्त वाढ दिसून आली आहे. एससीआय, कोचीन शिपयार्ड, गार्डन रीच शिपबिल्डर्स सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. आजही एससीआय अर्थात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (Shipping Corporation of India Ltd) शेअरमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली असून या शेअरनं ३२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ३१७ रुपयांवर झेप घेतली. गुरुवारी हा शेअर २८० रुपयांवर उघडला.

केवळ शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्याच शेअर्समध्ये नाही, तर अन्य कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी तेजी दिसून आली. Dredging Corporation of India Ltd च्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची वाढ झाली झाली. तर Cochin Shipyard च्या स्टॉक्समध्ये ४ टक्क्यांची आणि Garden Reach Shipbuilders मध्येही ५ टक्क्यांची वाढ झाली.

शेअर्समध्ये का आली तेजी?

दरम्यान, शिपिंग उद्योगासाठी मोठी बातमी समोर येत आहे. अर्थसंकल्पात शिपिंग उद्योगाला मोठी चालना मिळू शकते, अशी बातमी आहे. सूत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पात सरकार शिपबिल्डिंग स्कीमची मुदत २०२६ नंतर वाढवू शकते. या योजनेअंतर्गत २० टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

याशिवाय मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंडाचीही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मॅरिटाईम फंडमुळे स्वस्त दरात शिपिंग सेक्टरला लोन मिळण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये ग्रीन बोट योजनेचीही घोषणा होऊ शकते. त्याअंतर्गत दरवर्षी एक हजार ग्रीन बोटी अनुदानासह देण्याची योजना आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारगुंतवणूक