Join us

मोर्चाच्या भाषणात अधिकार्‍यांवर शिव्यांची लाखोली

By admin | Published: January 23, 2015 11:06 PM

आमदाराची जीभ घसरली: प्रक्षोभक भाषण करीत पोलिसांना दाखविल्या चपला

आमदाराची जीभ घसरली: प्रक्षोभक भाषण करीत पोलिसांना दाखविल्या चपला
सोलापूर: मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी दुसर्‍या दिवशीही प्रशासनातील सर्व अधिकार्‍यांना शिव्या देण्याचा ‘उपक्रम’ सुरूच ठेवला़ मरिआई चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ‘आधी रस्ते मग वाळू’ अशी घोषणा केली़ प्रक्षोभक भाषण करून त्यांनी उपस्थितांना पोलिसांकडे तोंड करून चपला दाखवायला लावल्या़ कितीही गुन्हे दाखल करा, माझी आमदारकी गेली तर घरी बसेन; मात्र अधिकार्‍यांना सोडणार नाही अशी धमकी त्यांनी भाषणातून दिली़
‘आधी रस्ते मग वाळू’ ही घोषणा हाती घेऊन आ़ रमेश कदम यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ मरिआई चौकातून साडेबारा वाजता हा मोर्चा सुरू झाला. एका तासाने तो जि़प़ गेटवर आला़ एका टेम्पोच्या टपावर बसून आमदार कदम हे जोशपूर्ण घोषणा देत प्रशासनाचा ‘उद्धार’ करीत होत़े दीड वाजता हा मोर्चा जि़प़ गेटवर येऊन धडकला़ मोर्चाचे सभेत रुपांतर झाल़े मोर्चामध्ये सहभागी झालेले आणि बघ्यांची भूमिका यामुळे जि़प़ प्रवेशद्वारावर तुडुंब गर्दी झाली़
आमदार कदम यांनी पुन्हा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना लक्ष्य केल़े मला माहीत आहे असे बोलल्यावर माझ्यावर अनेक गुन्हे दाखल होणार आहेत तरी मी घाबरत नाही़ मी जेलमध्ये जाण्यास तयार आह़े मी कोणाला घाबरत नाही, आमदारकी गेली तर घरी बसेन; मात्र प्रशासनातील अधिकार्‍यांना सोडणार नाही अशी धमकी दिली़ मला पंढरपूरला जायचे आहे, पोलिसांनी नोटीस दिली असून मी जेलमध्ये गेलो तरी आंदोलन सुरूच ठेवा ़ हातात बांबू घ्या आणि पोलिसांची, जिल्हाधिकार्‍यांची गाडी गावात आली तर त्यांना बांबू दाखवा असे फर्मान कदम यांनी यावेळी सोडल़े पंढरपूर पोलीस ठाण्यात जात असल्याचे सांगून ते निघाल़े त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना भेटून निवेदन सादर केल़े
यावेळी त्यांच्या मोर्चात विविध फलक घेऊन नागरिक सहभागी झाले होत़े यामध्ये बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, जि़प़चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, शरद कोळी, दिलीप देवकुळे यांच्यासह नागरिक उपस्थित होत़े राष्ट्रवादीचे पदाधिकारी तुरळक दिसत होत़े या मोर्चासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले होत़े

चौकट़़़
आमदाराची जीभ घसरली
यावेळी जि़प़चे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी भाषण करून रस्ते खराब झाले आहेत़ आमदारांची भूमिका योग्य आह़े आजवर कुणीही याला वाचा फोडली नसल्याचा उल्लेख केला़ दलित महासंघाचे दिलीप देवकुळे यांनी देखील जिल्हाधिकार्‍यांच्या गाडीचा दिवा फोडा, गाडी फोडा, गावात येऊ देऊ नका असे भाषण केले तर आमदार रमेश कदम यांनी भाषणात तलाठय़ापासून ते जिल्हाधिकार्‍यांपर्यंत आणि पोलिसांपासून ते पोलीस अधीक्षकांपर्यंत सर्वांवर अपशब्द वापरुन शिव्यांची लाखोली वाहिली़