आीष गावंडे/अकोला शिवसेना-भाजपची मागील २५ वर्षांपासूनची युती तुटल्यामुळे सैरावैरा झालेल्या शिवसेनेच्यावतीने ही निवडणूक आक्रमकपणे लढण्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी सेनेच्या पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुखांनी निवडणुकीपूर्वीच पश्चिम विदर्भात तलवार म्यान केल्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात प्रभावी दावेदार उभे न करता, कमकुवत दावेदारांना संधी दिल्या जात असल्याने हा प्रकार म्हणजे विरोधी पक्षाच्या उमेदवारांसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप निष्ठावान शिवसैनिक करू लागले आहेत. यामध्ये विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघासह बाळापूर व मूर्तिजापूर मतदारसंघाचा समावेश आहे.राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपची युती व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अचानक संपुष्टात आली. शिवसेना, भाजपचा काडीमोड होताच, ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. विधानसभेवर भगवा फडकविण्याच्या घोषणांचा पाऊस पडत असतानाच, शिवसेनेच्या पश्चिम विदर्भातील संपर्क प्रमुखांनी मात्र वेगळीच वाट निवडली आहे. प्रक्ष प्रमुखांनी अक ोला जिल्ातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी अकोला पूर्व व आकोट मतदारसंघातून इच्छुकांचे तिकीट जाहीर केले. युती तुटल्यामुळे अकोला पश्चिम, बाळापूर व मूर्तिजापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी पक्षाला रान मोकळे झाले. अर्थातच, संपूर्ण ताकद पणाला लावून या ठिकाणी सक्षम व प्रबळ दावेदार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जातील, अशी शिवसैनिकांना अपेक्षा आहे; परंतु निष्ठावान शिवसैनिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरण्याचे काम वरिष्ठ नेते करीत असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेकडे अकोला पश्चिम मतदारसंघासह बाळापूर मतदारसंघासाठी लढवय्ये उमेदवार असताना, या दोन्ही मतदारसंघातून महिला उमेदवारांना तिकीट देण्यावर पक्षाचे संपर्क प्रमुख ठाम असल्याची माहिती आहे. पक्षाकडे विविध मतदारसंघातून निवडणूक लढून त्या जिंकण्याचा अनुभव असण्यासह प्रखर हिंदुत्वाची भावना तेवत ठेवणार्या पहिल्या फळीसह दुसर्या फळीतील प्रभावी दावेदारांची मोठी संख्या आहे. अशा दावेदारांना हेतुपुरस्सरपणे डावलण्याचे काम वरिष्ठ नेते इमानेइतबारे करीत असल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. या मुद्यावर शुक्रवारी रात्री जिल्हाप्रमुखांच्या कार्यालयात इच्छुकांमध्ये चांगलेच घमासान रंगल्याची माहिती आहे.
निवडणुकीत शिवसेनेची तलवार म्यान? प्रभावी दावेदारांना डावलण्याचे कारस्थान
आशीष गावंडे/अकोला
By admin | Published: September 26, 2014 09:39 PM2014-09-26T21:39:58+5:302014-09-26T21:39:58+5:30