Join us

निवडणुकीत शिवसेनेची तलवार-जोड बातमी

By admin | Published: September 26, 2014 9:40 PM

बॉक्स...

बॉक्स...
जिल्हा परिषद, मनपातही कटू अनुभव
जिल्हा परिषदेच्या २०१०-२०११ मधील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपद शिवसेनेच्या, तर उपाध्यक्षपद काँग्रेसच्या वाटेला येणार होते. त्यावेळी शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हातमिळवणी करीत सत्तास्थापनेचा प्रयत्न केला होता; परंतु सेनेच्या सर्व ११ सदस्यांना वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत बोलावून घेतले आणि ऐन निवडणुकीला गैरहजर ठेवण्याचे पातक केले. असाच प्रकार मनपाच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत घडला. २०१२ मध्ये सभापती पद शिवसेनेच्या वाटेला येण्याची दाट चिन्ह असताना, सेनेच्या नगरसेवकांनी अपक्ष नगरसेवकाला मतदान करण्याचे फर्मान वरिष्ठांनी बजावले होते, हे येथे उल्लेखनीय.

बॉक्स....
शिवसैनिक संतप्त; इच्छुक राष्ट्रवादीच्या मार्गावर
एकीकडे विरोधी उमेदवारांचे पानिपत करण्याची भाषा वरिष्ठ नेते करीत असताना, तिकीट वाटपातून प्रबळ दावेदारांना डावलल्या जात असल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले आहेत. काही इच्छुक दावेदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपक रत असून, राकाँच्या तिकिटावर अकोला पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिल्या जात आहेत.