नवी दिल्ली :
आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला आहे. जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आले आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आता जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानींचीही घसरण झाली आहे. अव्वल श्रीमंतांमध्ये १०व्या क्रमांकावरून ते १२व्या स्थानावर घसरले आहेत. या वर्षात आतापर्यंत त्यांची संपत्ती २.३८ अब्ज डॉलरने घसरून ८४.७ अब्ज डॉलरवर आली आहे.
सर्वाधिक श्रीमंतबर्नार्ड अरनॉल्ट १८८ इलॉन मस्क १४५ जेफ बेझोस १२१ गौतम अदानी १२० बिल गेट्स १११ वॉरेन बफे १०८ लॅरी एलिसन ९९.५ लॅरी पेज ९२.३८ सर्जे ब्रिन ८८.७ स्टीव्ह बॉलमर ८६.९ कार्लोस स्लिम ८४.९ मुकेश अंबानी ८४.७ (मालमत्ता अब्ज डॉलर्समध्ये.)