Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतातील धक्कादायक आकडेवारी समोर; ३ वर्षांत ४७ टक्के लोकांना सायबर क्राइमचा फटका

भारतातील धक्कादायक आकडेवारी समोर; ३ वर्षांत ४७ टक्के लोकांना सायबर क्राइमचा फटका

प्रत्येक दहाजणांमधील सहाजण झालेल्या आर्थिक फसवणुकीची तक्रार संबंधित यंत्रणांकडे करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे दिसून आले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:24 AM2024-06-19T09:24:46+5:302024-06-19T09:25:04+5:30

प्रत्येक दहाजणांमधील सहाजण झालेल्या आर्थिक फसवणुकीची तक्रार संबंधित यंत्रणांकडे करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे दिसून आले आहे. 

shocking statistics of India In 3 years 47 percent of people were affected by fraud | भारतातील धक्कादायक आकडेवारी समोर; ३ वर्षांत ४७ टक्के लोकांना सायबर क्राइमचा फटका

भारतातील धक्कादायक आकडेवारी समोर; ३ वर्षांत ४७ टक्के लोकांना सायबर क्राइमचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वेगाने वाढले असले तरी यातून लोकांची होणारी आर्थिक लुबाडणूक हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनू लागला आहे. 

मागील तीन वर्षात देशांतील जवळपास ४७ टक्के लोकांना या लुबाडणुकीचा फटका बसल्याचे समोर आले आहे. यातील ३६ टक्के फसवणुकीचे प्रकार यूपीआय पेमेंट व्यवहारात घडले आहेत. लोकलसर्कल्स या संस्थेने ही पाहणी केली होती. प्रत्येक दहाजणांमधील सहाजण झालेल्या आर्थिक फसवणुकीची तक्रार संबंधित यंत्रणांकडे करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे दिसून आले आहे. 

भामटेगिरी १६६ टक्के वाढली
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये तब्बल १६६ टक्के वाढ झाली आहे. एकूण घटनांची संख्या ३६ हजारांपर्यंत पोहोचली आहे. या सर्व घटनांमध्ये चोरट्यांनी एकत्रितपणे १३,९३० कोटी रुपये लांबविल्याचे उघड झाले आहे.

डेटाची खुलेआम विक्री

- ऑनलाइन व्यवहार वाढले तरी भारतात ग्राहकांची खासगी तसेच अर्थव्यवहारांची माहिती खासगी कंपन्यांना विक्रीसाठी सहजपणे उपलब्ध आहे. 

- कित्येक आंतरराष्ट्रीय वेबसाइट व ॲप्सवर ओटीपी प्रमाणिकरण होत नाही. अशा व्यवहारांमध्ये फसवणुकीचा धोका अधिक असतो.

पाहणीत किती जणांचा सहभाग?  

देशातील ३०२ जिल्ह्यांमध्ये संस्थेने ही पाहणी केली. यासाठी २३ हजार जणांची मते जाणून घेण्यात आली. 

Web Title: shocking statistics of India In 3 years 47 percent of people were affected by fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.