Lokmat Money > बिझनेस न्यूज > दुकानदारांना बसणार चाप

दुकानदारांना बसणार चाप

महागाईला आळा घालण्यासाठी आणि एमआरपीच्या नावाखाली मनमानी करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने पावले उचलायचे ठरवले आहे.

By admin | Published: September 13, 2016 04:21 AM2016-09-13T04:21:59+5:302016-09-13T04:21:59+5:30

महागाईला आळा घालण्यासाठी आणि एमआरपीच्या नावाखाली मनमानी करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने पावले उचलायचे ठरवले आहे.

The shopkeepers will get the arc | दुकानदारांना बसणार चाप

दुकानदारांना बसणार चाप

नवी दिल्ली : महागाईला आळा घालण्यासाठी आणि एमआरपीच्या नावाखाली मनमानी करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने पावले उचलायचे ठरवले आहे. जीवनावश्यक वस्तू जनतेला किफायतशीर भावात मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने हे ठरवले आहे.
पाकीटबंद वस्तू एमआरपीच्या नावाने विकताना, बाजारातील किमतीपेक्षा चढ्या भावाने त्या विकल्या जातात. नाव मात्र एमआरपीचे पुढे केले जाते. त्यामुळे वस्तूच्या दरांबाबत मनमानी करणाऱ्या दुकानदारांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारच दूध, तेल, साखर, डाळ आदी जीवनावश्यक पदार्थांचे दर निश्चित करणार आहे. निश्चित केलेल्या दरांपेक्षा एखाद्या दुकानदाराने ते जादा भावाने विकणे सुरूच ठेवले आणि ग्राहकांची फसवणूक केली, तर त्यासाठी शिक्षेची तरतूद केली जाणार आहे. विक्रीबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला ५ हजार रुपयांचा दंड होऊ शकेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The shopkeepers will get the arc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.