Join us

होऊ दे खर्च; भरू या ईएमआय!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 8:46 AM

कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर लोकांनी मनमुराद शॉपिंग केली.

यावर्षी कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर लोकांनी मनमुराद शॉपिंग केली. दसरा, दिवाळी इत्यादी सणासुदीच्या काळात लोकांनी आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी भरघोस खर्च केला. यंदा निम्म्याहून अधिक लोकांनी रोख पैसे देण्याऐवजी ईएमआय किंवा क्रेडिट कार्डचा पर्याय वापरला आहे.

काय म्हणतात ग्राहक?

ईएमआय पर्याय असल्यामुळे आवडती वस्तू महाग असली तरीही खरेदी करता येते. क्रेडिट कार्डवर सहज ईएमआय मिळतो. त्यामुळे अडचण येत नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

ग्राहकांची कशात रूची, भारतीय लोकांनी बदलला खरेदीचा ट्रेंड 

६०% एम्बेडेड फायनान्स, २५% क्रेडिट कार्ड, १०% ‘बाय नाऊ पे लॅटर’, ५०%+ लोकांनी ईएमआयचा वापर. होम क्रेडिट इंडियाच्या ‘हाऊ इंडिया बॉरोज’ या सर्वेक्षणातून भारतीयांच्या शॉपिंग ट्रेंडबाबत माहिती समोर आली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनौ, पाटणा इत्यादी १६ शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

असा असतो पर्याय

कंपन्यांकडून नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देण्यात येतो. ऑनलाइन शॉपिंग कंपन्या आघाडीवर आहेत. क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डवरही सुविधा मिळते. ३ किंवा ६ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय मिळतात. त्यापेक्षा अधिक कालावधी व्याज द्यावे लागते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :खरेदी