मुंबई : दुकानांमध्ये जाऊन पारंपरिक पद्धतीने वस्तूंची खरेदी करण्यापेक्षा त्या ऑनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. शहरी भागातील ग्राहक ऑनलाइन असो अथवा ऑफलाइन, वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असतात. पार्टीवेअर ड्रेसेस, तसेच पॅण्टस यांच्या ऑनलाइन खरेदीसाठी मोठी पसंती दिसते. मात्र किराणा, दागिने, अंतरवस्त्रे, कामाच्या ठिकाणासाठीचे कपडे यांची खरेदी ही प्रामुख्याने दुकानात जाऊन केली जाते.‘लोकमत’च्या इनसाइट टीमने राज्यातील विविध शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून शहरी ग्राहकांची खरेदी आणि त्यासाठी वापरली जाणारी पद्धत याबाबत माहिती हाती लागली आहे. तीच येथे वाचकांसमोर मांडत आहोत.ग्राहक हे विविध वेबसाइटस्च्या माध्यमामधून खरेदी करीत असतात. ठराविक श्रेणीसाठी ठराविक ब्रॅण्डसना त्यांची पसंती असते. ऑनलाइन खरेदीसाठीच्या विविध वेबसाइटस्पैकी मिंत्रा ही सर्वाधिक लाडकी वेबसाइट असल्याचे या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे. भारतीय पारंपरिक पोषाखासाठी अन्य ब्रॅण्ड्सच्या तुलनेत रिलायन्स ट्रेण्डस्ला ग्राहकांची मोठी पसंती लाभत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असली, तरी अनेक ग्राहक हे वर्षभर आपल्या गरजेप्रमाणे खरेदी करीत असतात, असेही या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी असलेला पसंतीक्रमखरेदीचा प्रकार ऑनलाइन दुकानांमधून ऑफलाइन/ ऑनलाइन व ऑफलाइन/असे दोन्ही प्रकारकामाच्या ठिकाणचे कपडे २०% ४६% ३३%भारतीय पारंपरिक कपडे १९% २०% २२%शर्टस्/टॉप २०% ३४% ४५%पॅण्ट, ट्राऊजर्स २२% ३५% ४३%पाश्चात्य पद्धतीचे पार्टीवेअर २१% ३५% ४५%टी-शर्टस् २०% ३५% ४५%बूट, पट्टे २२% ३३% ४५%खोटे दागिने १७% ४७% ३५%खाद्यपदार्थ/किराणा १९% ४९% ३२%घड्याळे २२% ३३% ४५%अंतवस्त्रे १९% ४९% ३२%शॉपिंगसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट्सवेबसाइट शर्टस्/ब्लाऊज/टॉप ट्राऊजर्स/पॅण्ट्स पार्टी वेअर पाश्चिमात्य टी-शर्ट्स पारंपरिक भारतीय पोषाखमिंत्रा ४४% ६३% ५२% ५०% २९%फ्लिपकार्ट ५३% ६०% ४९% ५०% २२%अॅमेझॉन ५१% ५५% ५४% ४७% २२%डी-मार्ट ४१% ५६% ३७% ३५% २१%बिग बाजार ४४% ५३% ५१% ४६% १८%रिलायन्स ट्रेंडस् ३४% ३९% ३७% ३०% ३४%शॉपर्स स्टॉप ४२% ४९% ४३% ३७% १९%लाईफस्टाईल ३९% ४८% ४१% ३४% २०%खरेदीसाठीचे कारणकारण (%)शाळा/कॉलेजच्या वर्षाची सुरुवात २८सण ६५नवीन वर्ष ५२लग्न ६०नवीन कपड्यांचीगरज असेल तेव्हा ४६इतर २स्रोत : या सर्व मजकुराचा स्रोत हा ‘लोकमत’च्या इनसाइट टीमने सर्वेक्षण करून काढलेले निष्कर्ष, तसेच वेगवेगळे अहवाल व कंपन्यांच्या संकेतस्थळांवरील माहिती हा आहे.
शहरी ग्राहकांमध्ये शॉपिंगचे प्रमाण वाढतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 2:20 AM