नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात खरेदी हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. बदलत्या काळात खरेदीच्या पद्धती बदलल्या आहेत. ऑनलाईन खरेदीबरोबरच आता क्रेडिट कार्डचा पर्यायही खरेदीसाठी वापरला जात आहे. क्रेडिट कार्ड वापरण्याचे काही फायदेही आहेत. त्यामुळे ग्राहकांना डिस्काऊंट मिळू शकतो तसेच काही रिवॉर्ड पॉईंटही मिळतात. शिवाय हे पैसे देण्यासाठी तुम्हाला मुदतही मिळते. यामुळेच आता क्रेडीट कार्डाद्वारे खरेदी करण्याला प्राधान्य मिळत आहे.
क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे आहेत लाभ
इन्स्टंट डिस्काऊंट व कॅशबॅक
अनेक क्रेडिट कार्डवर इन्स्टंट डिस्काऊंट आणि कॅशबॅकच्या ऑफर्स असतात. लगेच पेमेंट न करण्याच्या सवलतीबरोबरच हा लाभ ग्राहकांना यात मिळतो.
ऑनलाईन पेमेंटवरील रिवॉर्ड पाॅइंट्स
वीज, पाणी, गॅस, रेल्वे तिकीट यांचे पेमेंट ऑनलाईन केल्यास अनेक बँका बिलात सवलत देतात, तसेच क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवर ‘रिवॉर्ड पॉईंट्स’ देतात. रिवॉर्ड पाॅईंट्स नंतर तुम्हाला रोखीत बदलता येतात.
रोख रक्कम काढण्याची सोय
आणीबाणीच्या काळात तुम्ही क्रेडिट कार्डवर रोख रक्कम काढू शकता. तसेच क्रेडिट कार्डवर कर्जही उपलब्ध होऊ शकते.
५० दिवसाची सवलत
बहुतांश सर्व बँका क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी तुम्हाला ५० दिवसाची सवलत देतात. बिलनिर्मिती झाल्यापासून पुढील ५० दिवसासाठी ही सवलत असते. त्यामुळे पैसे नसतानाही तुम्ही खरेदी करू शकता.
क्रेडिट कार्डने करा सणासाठीची खरेदी; मिळवा फायदे
क्रेडिट कार्ड वापरण्याचे काही फायदेही आहेत. त्यामुळे ग्राहकांना डिस्काऊंट मिळू शकतो तसेच काही रिवॉर्ड पॉईंटही मिळतात.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 05:58 AM2021-10-20T05:58:16+5:302021-10-20T05:58:26+5:30