- मनोज गडनीस, मुंबई
आकाशकंदिलापासून रेडिमेड फराळापर्यंत आणि फॅशनेबल कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा सर्वांनीच बाजार सजला असून, आजचा शनिवार व रविवार हा खास ‘शॉपिंग वीकेन्ड’ ठरणार आहे. यंदाच्या दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणजे आॅफलाईनसोबत आॅनलाईन खरेदीचाही जोर वाढला आहे आणि या दोन्ही बाजारांत निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे सूट योजनेचा वाढलेला टक्का ग्राहकांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. बाजार विश्लेषकांच्या मते यंदाच्या दिवाळीत ७० हजार कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल अपेक्षित आहे.
दिवाळीच्या निमित्ताने या आॅनलाइन आणि आॅफलाइन बाजाराचा फेरफटका मारल्यावर या दोन्ही बाजारांतून नेमके काय, कसे आणि कधी घ्यायचे याचे आडाखे ग्राहकांनी पक्के केल्याचे दिसते. नवीन कपडे, परफ्युम, फराळ आणि वैयक्तिक वापराच्या वस्तू याकरिता आॅफलाइन बाजाराला ग्राहकांनी पसंती दिली आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा नातेवाईक व मित्रांना गिफ्ट देण्यासाठी आॅनलाइन माध्यमांना पसंती देण्याकडे कल असल्याचे दिसून आले.
आॅनलाइन शॉपिंगचा ५५ हजार कोटी रुपयांचा टप्पा
स्मार्टफोनची वाढलेली संख्या, ई-कॉमर्स कंपन्यांनी सादर केलेली ग्राहकसुलभ अॅप यावर्षी उपलब्ध झाल्यामुळे यंदा आॅनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर असेल, असे विश्लेषण ई-कॉमर्स विषयाचे अभ्यासक पराग प्रामाणिक यांनी केले. ते म्हणाले की वित्तीय व्यवहारांसाठी पेमेंट बँकेचा सुरक्षित मार्ग, ई-बँकिंग, मोबाइल व्हॅलेट आणि कॅश आॅन डिलिव्हरी या पर्यायांमुळे त्याचा वापर वाढला आहे.
480रुपये किलो दराने परदेशात फराळ
परदेशातील भारतीयांना ताजा, खुमासदार फराळ वेळेत मिळावा याकरिता अनेक दुकानांनी व खासगी उत्पादकांनी परदेशात फराळ पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली.
शॉपिंगचा वीकेण्ड!
आकाशकंदिलापासून रेडिमेड फराळापर्यंत आणि फॅशनेबल कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा सर्वांनीच बाजार सजला असून, आजचा शनिवार व रविवार हा खास ‘शॉपिंग वीकेन्ड’ ठरणार आहे.
By admin | Published: November 7, 2015 04:02 AM2015-11-07T04:02:38+5:302015-11-07T04:02:49+5:30