ध्मनिरपेक्षतेला प्राचीन जागतिक परंपरा नागपूर : धर्मनिरपेक्षता ही आधुनिक काळातील विचारधारा नसून वास्तविक ती प्राचीन जागतिक परंपरा आहे. आपण आधुनिकवाद आणि विकासाकडे वळलो तेवढ्याच प्रमाणात धर्मनिरपेक्षतेपासून दूर जात आहोत, असे प्रतिपादन मिशीगन विद्यापीठातील (अमेरिका) प्रसिद्ध विचारवंत डॉ. स्टीवर्ट गार्डन यांनी के ले. वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था आणि इप्रा संस्थेच्या विद्यमाने आयोजित विषमता असुरक्षितता व हिंसाचार विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. भारतातील भेदभावाची व्यवस्था पूर्वीपासूनच अस्तित्वात असली तरी वसाहतीक काळात इंग्रजी राजवटीचा परिणाम म्हणून त्यांची व्याप्ती अधिकच वाढली. पण मुगल, मराठा या राजवटी धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर उभ्या होत्या. डॉ. एलिना सेन म्हणाल्या, समकालीन जागतिक व्यवस्था हिंसावादाच्या विळख्यात असून वर्तमान लोकशाहीसमोर ते प्रमुख आव्हान आहे. भारतात स्त्री-पुरुष समानता आहे, ती अमेरिकेत दिसत नाही. अमेरिकेत स्त्री पुरुष समानतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी धनंजय वंजारी, डॉ. शैलेन्द्र लेंडे, डॉ. विकास जांभुळकर, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, डॉ. शाम कोरेटी, अजित चुनारकर, डॉ. बोरकर. डॉ. वासनिक, डॉ. कपिल सिंघल प्रामुख्याने उपस्थित होते. ---------------------------मारुती देवस्थान, महाल नागपूर : श्री मारुती देवस्थानच्यावतीने गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, पारायण वाचन, भजनसंध्या व महाप्रसादाचे आयोजन गरुडखांब रोड, महाल येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १४ फेब्रुवारीपर्यंत चालेल. याप्रसंगी श्रींची शोभायात्रा आणि अभिषेक व होमहवन करण्यात आले. ११ फेब्रुवारीला श्रींची प्राणप्रतिष्ठा व प्रगटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ तारखेला सकाळपासून श्रींच्या पारायणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. १३ ला सायंकाळी भजनसंध्या होईल. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थोडक्यात नागपूर
धर्मनिरपेक्षतेला प्राचीन जागतिक परंपरा
By admin | Published: February 11, 2015 12:33 AM2015-02-11T00:33:34+5:302015-02-11T00:33:34+5:30