- हर्षद चेतनवाला (को-फाउंडर, MyWealthGrowth.com)
धनत्रयोदशी साडेतीन मुहुर्तांपैकी व शुभ दिवसांपैकी एक मानली जाते. या दिवशी लोक सोने, चांदी व अन्य धातुची खरेदी करतात. युगानुयुगे धनत्रयोदशीच्या औचित्यावर सोन्याला सर्वाधिक पसंती दिली गेली आहे. आणि आपण भारतीय वर्षानुवर्षे बचत करणारे सोन्याचे गुंतवणूकदार आहोत. क्वचितच असे कुटुंब असेल जिथे सोन्याच्या दागिन्यांची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात नसेल, आपण सोन्याच्या किमतीची पर्वा न करता सोन्याकडे पक्की गुंतवणूक, संपत्ती आणि सुरक्षित पर्याय म्हणून बघतो.
धनत्रयोदशीसारख्या शुभ प्रसंगी सोन्याची खरेदी करण्याची आपली सांस्कृतिक मूल्येही आहेत आणि अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे सोन्याची किंमत कितीही असली तरी धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी होतेच. ही परंपरा आणि पद्धत्त पुढे नेण्यावर त्यांचा विश्वास असल्याने ते योग्यच आहे. गुंतवणुकीच्या रुपात सोन्याकडे पाहताना आपल्या प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टीकोन असु शकतो परंतु सोन्यामध्ये गुंतवणुक करताना एक विशिष्ट पोर्टफोलियो निर्धारित करणे आपणासाठी उपयुक्त ठरेल. आपल्या आवश्यकता आणि प्रोफाइलच्या आधारे प्रत्येकाची गुंतवणूक ही वेगवेगळी असू शकते. आज जर तुमच्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून किती सोनं आहे हे तपासून पाहायचं असेल तर, सोन्याच्या दागिन्यांचा उपयोग वैयक्तिक वापरासाठी न करणे योग्य ठरेल, जेणेकरून पुढे गरज भासल्यास आवश्यकतेनुसार त्याला पैशात रूपांतरित करता येईल.
गेल्या एका वर्षात सोन्याच्या किंमतीत झालेल्या वाढीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या एका वर्षात सोन्याचे दर प्रति औंस .१०६,३०० वरून (२४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत) .१४०,१३२ पर्यंत वाढले (२३ ऑक्टोबर २०२० रोजी) ३२ टक्यांनी वाढले आणि गेल्या एका वर्षात ते प्रति औंस १५४, ९०१ पर्यंत गेले. सोन्याच्या किंमतीतील ही भरीव वाढ एका वर्षापूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा समजली जाऊ शकते. कोविड -१९ च्या जगभरातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किंमतीत ऐतिहासिकदृष्ट्या वाढ दिसुन आली आणि कोविड -१९ किंवा २००८ चे आर्थिक मंदी यासारख्या घटनांच्या वेळी सोन्याची मागणी वाढते कारण लोक जगभरात गुंतवणूक आणि सोने ठेवण्यास प्राधान्य देतात. म्हणूनच अत्यंत अनिश्चित काळात सोन्याच्या किंमती वाढतात.
तर, या धनत्रयोदशीला तुम्ही सोन्यात गुंतवणूक करावी की करू नये?
दहा वर्षांपूर्वी धनत्रयोदशीला केलेल्या सोन्याच्या गुंतवणूकीने वर्षानुवर्षे कशी कामगिरी केली ते पाहूया.
धनत्रयोदशी तारीख | प्रति ट्रॉ औंस किंमत (INR) | २०१० च्या धनतेरसवर केलेल्या गुंतवणूकीवर परतावा * |
२३-ऑक्टोबर-२० | १,४०,१३२ | ८.५७% |
२५-ऑक्टोबर-१९ | १,०७,३०४ | ६.३६% |
0५-नोव्हेंबर-१८ | ९०,१०२ | ४.८४% |
१७-ऑक्टोबर-१७ | ८३,४२५ | ४.४३% |
२८-ऑक्टोबर-१६ | ८५,०१९ | ५.५०% |
0९-नोव्हेंबर-१५ | ७२,३४४ | ३.२२% |
२२-ऑक्टोबर-१४ | ७६,१३० | ५.४४% |
०२-नोव्हेंबर-१३ | ८१,६६६ | ९.८१% |
१२-नोव्हेंबर-१२ | ९५३८७ | २४.०४% |
२५-ऑक्टोबर-११ | ८१,९८० | ३४.०४% |
०५-नोव्हेंबर-१० | ६१,७०२ |
|
२३ ऑक्टोबर २०२० पर्यंत सोन्याने ८.५७ % परतावा दिला आहे. ज्यात गेल्या एका वर्षात सोन्याच्या किंमतीतली वाढ ही आहे. एक वर्षापूर्वी, २०१९ च्या धनतेरसवर २०१० च्या त्याच गुंतवणुकीने ६.३६% परतावा दिला होता. सोन्याच्या गुंतवणुकीद्वारे संकट काळात चांगले काम करण्याची आणि नंतर काही काळ चपखल राहण्याची ही प्रवृत्ती आहे.
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की काही काळासाठी सोन्याच्या गुंतवणूकीने महागाई मध्ये वाढ होईल म्हणूनच, सोन्याचे एक छोटीसे विभाजन करु शकते. परंतु अल्प मुदतीचा परतावा आणि वाढती किंमत पाहता मोह आटोक्यात घेणे कधीही फायद्याचे ठरेल.
या धनत्रयोदशीला, आपण जर एखाद्या सांस्कृतिक दृष्टीकोनातून सोने विकत घेत असाल तर तो आपल्या संस्कृती आणि परंपरेचा भाग असल्याने जास्त विचार न करता पुढे जायला हवे.
परंतु, जर आपण या धनतेरस दरम्यान गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याचा निर्णय घेत असाल तर आपण पुढील गोष्टी लक्षात ठेवू शकता-
-जर तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करण्यात इच्छुक असाल किंवा गेल्या वर्षभरात तुम्ही सोने विकत घेतलं असेल तर आति प्रमाणात सोने विकत घेतलं तर ते व्यर्थ ठरू शकेल.
-जर आपणास सोन्यात गुंतवणूक किंवा खरेदी वाढवायची असेल तर चांगल्या सोयिस्कर मासिक गोल्ड फंडात किंवा डिजिटल सोन्यात आपल्या सोयीनुसार गुंतवणूक केल्यास सोन्याचे सध्याचे भाव, धनत्रयोदशीचा काळ, त्याची ऐतिहासिक अस्थिरता लक्षात घेणे कधीही चांगले. येथे आपण धनतेरसच्या शुभ दिवशी सोन्यातील मासिक गुंतवणुकीची सुरुवात निश्चितपणे करू शकता आणि एकाच वेळी गुंतवणूक करण्यापेक्षा प्रत्येक महिन्यात काही गुंतवणूक करू शकता.