अक्षय तृतियेदिवशी सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतांनुसार या दिवशी सोनं खरेदी केल्याने घरात शांती आणि सुखसमृद्धी येते. यंदा अक्षय तृतिया २२ एप्रिल रोजी आहे. जर या शुभमुहुर्तावर तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल, तर गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे फिजिकल, डिजिटल आणि ईटीएफ गोल्ड असे तीन पर्यात आहेत.
गुंतवणुकीसाठी भारतीयांना नेहमीच सोनं हा उत्तम पर्याय वाटत आला आहे. जर तुम्ही अक्षय तृतियेदिवशी इन्व्हेस्टमेंट म्हणून फिजिकल गोल्ड किंवा डिजिटल गोल्डशी संबंधित स्किममध्ये पैसे गुंतवू इच्छित असाल तर यामधील कशामध्ये पैसे गुंतवणे अधिक फायदेशीर ठरेल, तसेच टॅक्सशी संबंधित काय लाभ मिळतील, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
सर्वसाधारणपणे आपल्याकडे बहुतांश लोक पारंपरिक पद्धतिने फिजिकल गोल्ड खरेदी करणं पसंद करतात. कारण अनेकांना डिजिटल गोल्डबाबत फारशी माहिती नाही. सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी आजच्या काळात सॉवरेन गोल्ड बाँड आणि ईटीएफ गोल्ड सारखे नवे डिजिटल पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्वेलरीच्या तुलनेत डिजिटल गोल्डमध्ये अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता असते. तसेच त्याच्या सुरक्षेचीही पूर्ण हमी असते.
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुक म्हणून सॉवरेन गोल्ड बाँड हा उत्तम पर्याय आहे. हे एक प्रकारचे पेपर गोल्ड किंवा डिजिटल गोल्ड असते. ज्यामध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाते. त्यात तुम्ही कुठल्या दराने सोनं खरेदी केलं आहे, याचा उल्लेख अकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१५ मध्ये सॉवरेन गोल्ड बाँड स्किम सुरू केली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे त्या माध्यमातून एक ग्रॅम सोन्याचीही खरेदी केली जाऊ शकते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या रिटर्नबरोबरच त्यावर दरवर्षी व्याजसुद्धा मिळते.
सॉवरेन गोल्ड बाँडशिवाय तुम्ही ईटीएफ गोल्डमध्येही गुंतवणूक करू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाऊंट असणं आवश्यक आहे. कारण गोल्ड ईटीएफची शेअरप्रमाणे खरेदी किंवा विक्री करता येते. त्याशिवाय गोल्ड म्युच्युअल गोल्ड फंडसुद्धा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.
फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजिटल गोल्डचे आहेत हे फायदे - जेव्हा सोने खरेदी केली जाते, तेव्हा त्यावर कर भरावा लागतो. मात्र डिजिटल गोल्डच्या खरेदीवर जीएसटी द्यावा लागत नाही. कारण या सिक्युरिटीवर जीएसटी लागत नाही. अशा प्रकारे आपण थेट गुंतवल्या जाणाऱ्या रकमेवर ३ टक्क्यांची बचत करू शकतो. - डिजिटल गोल्ड प्रॉडक्ट्स कधीही खरेदी किंवा विक्री करता येऊ शकतात. तसेच फिजिकल गोल्डच्या विक्रीसाठी दुकानांवर जावं लागतं. तसेच दुकानदार जुनं सोनं हे कमी किमतीमध्ये खरेदी करतात.- फिजिकल गोल्डच्या खरेदीवेळी शुद्धतेवर विशेष लक्ष द्यावं लागतं. मात्र डिजिटल गोल्डमध्ये अशा प्रकारची कुठलीही अडचण येत नाही.
डिजिटल गोल्डवर फिजिकल गोल्डप्रमाणेच कर आकारला जातो. मात्र या दराचा दर होल्डिंग पिरीयडवर अवलंबून असतो. ३ वर्षांपेक्षा कमी वेळासाठी ठेवलेल्या डिजिटल गोल्डवर कॅपिटल गेन इन्कम टॅक्स स्लॅबच्या आधारावर लागू होतो. इंडेक्सेशन बेनिफिटसह २०.८ टक्के (उपकरासह) वर ३ वर्षांनंतर डिजिटल गोल्ड विकण्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो.