Lokmat Money > बिझनेस न्यूज > Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

Adani Enterprises Sebi : अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसला बाजार नियामक सेबीकडून (SEBI) दोन कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 10:43 AM2024-05-03T10:43:41+5:302024-05-03T10:43:55+5:30

Adani Enterprises Sebi : अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसला बाजार नियामक सेबीकडून (SEBI) दोन कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Show cause notice sent by SEBI to Adani Enterprises case related to Hindenburg investigation | Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

Adani Enterprises Sebi : अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसला बाजार नियामक सेबीकडून (SEBI) दोन कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या दोन्ही नोटिसा हिंडेनबर्ग अहवालाच्या प्रकरणात समूहाविरोधात सुरू असलेल्या तपासाशी संबंधित आहेत. चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याबरोबरच कंपनीने २ मे रोजी रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. अदानी एंटरप्रायझेसनं दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीला सेबीकडून लिस्टिंग अॅग्रीमेंट आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स (LODR रेग्युलेशन) तरतुदींचे पालन न केल्याबद्दल नोटीस मिळाली आहे.
 

Adani Enterprises नं काय म्हटलं?
 

फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कथित नॉन-कम्प्लायन्स थर्ड पार्टीसोबत काही व्यवहारांच्या संदर्भात पार्टी ट्रान्झॅक्शन आणि गेल्या काही वर्षांतील स्टॅच्युअरी ऑडिटर्सच्या पियर रिव्ह्यू सर्टिफिकेशनच्या व्हॅलिडिटीशी संबंधित आहे. दरम्यान, कंपनीनं एका निवेदनात स्पष्ट केलंय की या कारणे दाखवा नोटीसचा आर्थिक वर्ष २०२४ च्या वित्तीय स्टेटमेंटवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम झाला नाही.
 

अदानी एंटरप्रायझेसनं म्हटलं की, गेल्या वर्षी अदानी समूहाच्या कंपन्यांवरील हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी एंटरप्रायझेसनं एप्रिल २०२३ मध्ये शॉर्ट-सेलर रिपोर्ट (एसएसआर) मध्ये नमूद केलेल्या व्यवहारांचा एका लॉ फर्मद्वारे स्वतंत्र मूल्यांकनाद्वारे आढावा घेतला. एक्सचेंज फाइलिंगमध्ये दावा करण्यात आलाय की लॉ फर्मच्या मूल्यांकनात असं दिसून आलंय की एसएसआरमध्ये नमूद केलेल्या कथित संबंधित पक्षांपैकी कोणीही पॅरेंट कंपनी किंवा त्याच्या सब्सिडायरी कंपन्यांशी संबंधित नव्हते.

Web Title: Show cause notice sent by SEBI to Adani Enterprises case related to Hindenburg investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.