Join us

दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 2:48 PM

या दोन सख्ख्या भावांनी खेळण्याच्या वयात कॉम्प्युटरला जवळं केलं आणि अतिशय कमी वयात सॉफ्टवेअर कंपनी उभारली.

Success Story : आपल्या देशात असे एक तरुण आहेत, ज्यांना पदवी घेतल्यानंतरही आयुष्यात काय करावे? असा प्रश्न पडतो. पण, 14-15 वर्षे वयोगटातील 6 वी आणि 8 वीत शिकणाऱ्या दोन भावांनी अशी गोष्ट करुन दाखवली, जी करण्यासाठी अनेकांना वर्षानुवर्षे मेहनत करावी लागते. या दोघांनी असा पराक्रम केला, ज्यामुळे ते देशभरातील लाखो तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. 

साधारणपणे 6वी आणि 8वीत शिकणारी मुले 10वी-12वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर डॉक्टर, इंजिनीअर, वकील किंवा इतर कुठली प्रतिष्ठित नोकरी करण्याचा विचार करतात. पण, या दोघांनी लहानपणापासूनच बिझनेसमन बनण्याचे स्वप्न पाहिले होते. विशेष म्हणजे, त्यांनी हे स्वप्न लहानपणीच साकार केले आणि सहावी-आठवीमध्ये शिकत असतानाच भारतातील सर्वात तरुण CEO देखील बनले. त्यांच्याबद्दल ऐकून तुमच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की, ही मुलं कोण आहेत आणि त्यांनी लहान वयात नेमकं केलं तरी काय?

कमी वयात बनले सीईओश्रवण कुमारन आणि संजय कुमारन, अशी या दोन मुलांची नावे आहेत. कदाचित तुम्ही हे नाव आधी ऐकले नसेल, पण व्यावसायिक जगतात त्यांची बरीच चर्चा आहे. देशातील सर्वात तरुण ॲप डेव्हलपर होण्याचा मान त्या दोघांनी पटकावला आहे. वयाच्या 10 आणि 12 व्या वर्षी श्रवण आणि संजयने 2011 मध्ये चेन्नई येथील त्यांच्या घरातून Godimension नावीची कंपनी सुरू केली. संजय CEO आहे, तर श्रावण कंपनीचा चेअरमन आहे. 

वडिलांकडून कॉम्प्युटर शिकलोया दोघांना लहानपणापासूनच कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये प्रचंड रस होता. त्यांचे वडील कुमारन सुरेंद्रन यांनी त्यांची प्रतिभा आणि समर्पण ओळखले आणि त्यांना या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा दिली. यानंतर दोघांनी लहानपणापासूनच संगणकावर काम करायला सुरुवात केली. या मुलांनी वयाच्या अवघ्या 4 व्या वर्षी पीपीटी बनवण्यास सुरुवात केली. एक एक पायरी चढत त्या दोघांनी कंपनी उभारली आणि वर्षांत 7 मोबाइल ॲप्स तयार केले, जे 50 हून अधिक देशांमध्ये प्रसिद्ध झाले. 

150 हून अधिक ॲप तयार केलेकुमारन ब्रदर्सने विकसित केलेले पहिले ॲप कॅच मी कॉप हे भारतातील प्रसिद्ध बालपणीच्या ‘चोर-पोलीस’ खेळावरुन प्रेरित गेमिंग ॲप होते. त्यांच्याद्वारे डिझाइन केलेल्या इतर ॲप्समध्ये मुलांसाढी एज्युकेशन ॲप- अल्फाबेट बोर्ड आणि कलर पॅलेट, इमर्जन्सी सर्व्हिस ॲप, प्रार्थना ॲप आणि गेमिंग ॲप, सुपरहिरो आणि कार रेसिंग अॅप्चसा समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत लहान मोठे मिळून 150 ॲप्सही विकसित केले आहेत.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकतंत्रज्ञानप्रेरणादायक गोष्टी