Lokmat Money > बिझनेस न्यूज > 2G आणि 3G नेटवर्क बंद करा, Jio नं केली मागणी; काय होणार याचा फायदा? 

2G आणि 3G नेटवर्क बंद करा, Jio नं केली मागणी; काय होणार याचा फायदा? 

देशातील पहिल्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनं मोठ्या प्रमाणात 4G आणि 5G चं जाळं देशभरात पसरवलं आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 01:41 PM2024-01-31T13:41:07+5:302024-01-31T13:42:00+5:30

देशातील पहिल्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनं मोठ्या प्रमाणात 4G आणि 5G चं जाळं देशभरात पसरवलं आहे

Shut down 2G and 3G networks Jio demands to government train papers What will be the benefit | 2G आणि 3G नेटवर्क बंद करा, Jio नं केली मागणी; काय होणार याचा फायदा? 

2G आणि 3G नेटवर्क बंद करा, Jio नं केली मागणी; काय होणार याचा फायदा? 

देशातील पहिल्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनं (Reliance Jio) मोठ्या प्रमाणात 4G आणि 5G चं जाळं देशभरात पसरवलं आहे. वेळोवेळी जिओ 2G मुक्त भारत बद्दलही बोलत आली आहे. 2G आणि 3G नेटवर्क आता फेज आऊट केलं पाहिजे अशी मागणी रिलायन्स जिओनं सरकारकडे केली आहे. ट्रायच्या कन्सल्टन्ट पेपरला उत्तर देताना कंपनीनं ही मागणी केली.  'Digital Transformation through 5G Ecosystem' साठी ट्रायनं उत्तर मागवलं होतं.
 

सरकारनं 2G आणि 3G नेटवर्क बंद करण्यासाठी एक पॉलिसी आणली पाहिजे, असं जिओनं दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. परंतु असं करणं सरकार आणि कंपन्या दोन्हींसाठी सोपं नसेल.
 

३० कोटी लोक वापरतात 2G, 3G नेटवर्क 
 

भारतात सद्यस्थितीत ३० कोटी असे मोबाइल युझर आहेत जे 2G, 3G नेटवर्क वापरतात. एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल सध्या 2G, 3G नेटवर्कचा वापर करतात. अनेक जण फीचर फोनचा वापर करत असल्यानं त्यांना 4G, 5G नेटवर्कवर स्विच होणं शक्य नाही.
 

याप्रकरणी जिओनं सरकारकडे एक मागणी केली आहे. 'सरकारनं एक पॉलिसी आणि गाइडपाथ तयार केला पाहिजे. यामध्ये 2G, 3G नेटवर्क पूर्णपणे बंद करण्याची माहिती असली पाहिजे. याच्या मदतीनं विनाकारणाच्या नेटवर्क कॉस्टपासून बचाव होईल. ग्राहकांना 4G, 5G वर मायग्रेट करण्यास सोपं होईल आणि इकोसिस्टमला उत्तम करण्यास मदत मिळेल,' असं जिओनं म्हटलं.
 

जिओला काय होणार फायदा?  


जिओची सेवा केवळ 4G, 5G वर उपलब्ध आहे. तर अन्य कंपन्या 2G, 3G नेटवर्कचाही वापर करतात. अशात 2G, 3G नेटवर्क बंद झाल्यास त्याचा जिओला फायदा होऊ शकतो. सिम अपग्रेड करताना अनेक जण जिओच्या सेवांवरही मायग्रेट करू शकतात. 2G युझर्सना आकर्षित करण्यासाठी जिओ सातत्यानं प्रयत्न करत आहे. कंपनीनं 4G सपोर्टवाले फीचर फोनही लाँच केलेत. यांची किंमतही सामान्य फोन्स इतकीच आहे. परंतु यात जिओ शिवाय अन्य कोणतीही सेवा वापरता येत नाही. 

Web Title: Shut down 2G and 3G networks Jio demands to government train papers What will be the benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.