नवी दिल्ली : हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर गुरुवारी रात्री आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशभरात अनेक सोन्या-चांदीच्या दुकानांवर छापे मारल्यामुळे राजधानीमधील व्यापाऱ्यांत घबराट पसरली. राजधानी दिल्लीतील सराफा व्यापाऱ्यांनी शुक्रवारी आपली दुकाने बंद ठेवली.
हजार-पाचशेच्या नोटांच्या बदल्यात व्यवहार केले जात असल्याची तसेच कमिशनवर या नोटा स्वीकारल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी छापे मारले होते. दिल्लीतील दरिबा कल्याण, चांदणी चौक आणि करोल बाग या भागांत छापे मारले होते. आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, काळा पैसा बाहेर काढण्याच्या दोन संधी सरकारने दिलेल्या आहेत. त्यामुळे आता काळ्या पैशावर कठोरपणे कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.