सिग्नेचर ग्लोबल इंडियाच्या आयपीओनं (Signature global India IPO) शेअर बाजारात जोरदार एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर्स बीएसई वर 15.5 टक्के प्रीमियमसह 445 रुपयांवर लिस्ट झाले. सिग्नेचर ग्लोबल इंडियाचा प्राइस बँड 366 ते 385 रुपये निश्चित करण्यात आला होता. कंपनीचा आयपीओ 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला होता.सिग्नेचर ग्लोबल इंडियाचा शेअर बीएसईवर 445 रुपयांवर लिस्ट झाला होता. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांकी स्तर 451.80 रुपये आहे. मात्र, लिस्टिंग झाल्यानंतर काही कालावधीनंतर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत घसरण झाली. सकाळी 10.30 वाजता बीएसईवर सिग्नेचर ग्लोबल इंडियाचे शेअर्स 447 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. बातमी लिहिताना हा शेअर 17 टक्क्यांच्या वाढीसह 451 रुपयांवर ट्रेड करत होता.सिग्नेचर ग्लोबल इंडियाच्या आयपीओची इश्यू प्राईज 730 कोटी रुपये होती. कंपनीच्या आयपीओमध्ये 1.57 कोटी किमतीचे फ्रेश शेअर्स जारी करण्यात आले आहेत. त्याच वेळी, विक्रीसाठी 33 लाख शेअर्स ऑफर फॉर शेअर अंतर्गत जारी करण्यात आले आहेत. सिग्नेचर ग्लोबल इंडियाचा आयपीओ बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी लिस्ट झाली आहे.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
'या' IPO ची बाजारात धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा, झाले मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 2:00 PM