नवी दिल्ली : जुलैमध्ये रेल्वेचा मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही क्षेत्रांतील व्यवसाय अचानक वाढला आहे. रेल्वेच्या इतिहासात जुलै महिना व्यवसायासाठी दुर्बल समजला जातो. तरीही या महिन्यात रेल्वेचा व्यवसाय लक्षणीयरीत्या वाढल्याचे समोर आले आहे.
वरिष्ठ रेल्वे अधिकाºयाने सांगितले की, यंदाचा जुलै महिना रेल्वेला प्रचंड कमाई देऊन गेला आहे. या महिन्यात रेल्वेने ९४.0९ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. हा रेल्वेचा सार्वकालिक उच्चांक असून, हा व्यवसाय गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत ४.७५ टक्क्यांनी जास्त आहे.
प्रवासी वाहतुकीच्या बाबतीतही रेल्वेने अशीच नेत्रदीपक कामगिरी जुलैमध्ये केली. एप्रिल ते २0 जुलै या काळात ६0.५ दशलक्ष अधिक प्रवाशांनी रेल्वेमधून प्रवास केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा २.४१ टक्के अधिक आहे. या वित्तवर्षात २0 जुलैपर्यंत रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून १५,७५८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी या काळातील उत्पन्न १४,७३९ कोटी रुपये होते. अधिका-याने सांगितले की, यंदाच्या जुलैमध्ये स्टीलची वाहतूक २५ टक्क्यांनी वाढली.
रेल्वेच्या व्यवसायात लक्षणीय वाढ,मालवाहतूक वाढली; प्रवाशांच्या संख्येतही पडली भर
जुलैमध्ये रेल्वेचा मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही क्षेत्रांतील व्यवसाय अचानक वाढला आहे. रेल्वेच्या इतिहासात जुलै महिना व्यवसायासाठी दुर्बल समजला जातो.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:35 AM2017-08-03T00:35:55+5:302017-08-03T00:36:21+5:30