Lokmat Money > बिझनेस न्यूज > रोखीपेक्षा फास्टॅगने येणाऱ्या टोलमध्ये लक्षणीय वाढ,भीम अ‍ॅपवरही सुविधा

रोखीपेक्षा फास्टॅगने येणाऱ्या टोलमध्ये लक्षणीय वाढ,भीम अ‍ॅपवरही सुविधा

दैनिक टोलवसुलीत ६६ टक्क्यांनी वाढ : भरणाºया वाहनांची संख्या २७.७८ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 03:32 AM2019-12-27T03:32:01+5:302019-12-27T03:32:54+5:30

दैनिक टोलवसुलीत ६६ टक्क्यांनी वाढ : भरणाºया वाहनांची संख्या २७.७८ लाखांवर

Significant increase in toll coming from Fastag than cash | रोखीपेक्षा फास्टॅगने येणाऱ्या टोलमध्ये लक्षणीय वाढ,भीम अ‍ॅपवरही सुविधा

रोखीपेक्षा फास्टॅगने येणाऱ्या टोलमध्ये लक्षणीय वाढ,भीम अ‍ॅपवरही सुविधा

फास्टॅगच्या विक्रीमध्ये दररोज तब्बल लाखाने वाढ

नवी दिल्ली : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर रोखीपेक्षा फास्टॅगने अधिक टोलवसुली होऊ लागली आहे. नोव्हेंबरच्या तिसºया आठवड्यापासून ते डिसेंबरच्या तिसºया आठवड्याच्या अखेरपर्यंतच्या एक महिन्यात फास्टॅगने झालेल्या दैनिक टोलवसुलीत २६.४ कोटी रुपयांपासून ते ४४ कोटी म्हणजे सुमारे ६६ टक्क्यांनी वाढ झाली. याउलट याच काळात रोखीने झालेली रोजची टोलवसुली ३० टक्क्यांनी कमी होऊन ५१ कोटी रुपयांवरून ३५.५ कोटी रुपयांवर आली.

आतापर्यंत एक कोटी चार लाख फास्टॅगची विक्री झाली असून त्यात रोज सरासरी एक लाखाने वाढ होत आहे. अधिकाधिक वाहनांना फास्टॅग लावले जातील तशी या माध्यमातून होणाºया टोलवसुलीत आणखी वाढ होईल, अशी महामार्ग मंत्रालयास आशा आहे.
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार फास्टॅगने टोल भरणे लोकांना पसंत पडत असून ते या माध्यमाचा वाढता स्वीकार करत असल्याचे आकडेवारीवरून
दिसते. १६ डिसेंबरपासून आतापर्यंत फास्टॅगने टोल भरणाºया वाहनांची दैनिक संख्या १९.५ लाखांवरून २७.७८ लाख होणे हे याचेच निदर्शक आहे.
महामार्गांच्या टोल प्लाझांमधून जाणाºया आणि टोल भरणाºया वाहनांचा रोजचा आकडा नक्की किती हे सांगणे कठीण असले तरी देशभरातील टोलनाक्यांवर दररोज सरासरी ६० लाख टोलवसुलीचे व्यवहार होत असावेत, असा अंदाज अधिकाºयांनी व्यक्त केला.
देशभरात नोंदणी झालेल्या वाहनांची सध्याची संख्या सुमारे ७० कोटी आहे. त्यापैकी ७० टक्के दुचाकी वाहने आहेत. चारचाकी प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांची संख्या सुमारे सहा कोटी असावी.
टोल फक्त चारचाकी किंवा त्याहून अधिक वाहनांच्या वाहनांकडूनच वसूल केला जातो. यापैकी बरीचशी चारचाकी वाहने फक्त शहरातल्या शहरांत वापरली जातात.
त्यामुळे त्या वाहनांना फास्टॅग लावण्याची गरज नाही. म्हणजेच आणखी ४०-५० लाख चारचाकी वाहनांनी फास्टॅग घेतले की महामार्गावर धावणाºया या वर्गातील ८० ते ९० टक्के वाहनांना या
पद्धतीने टोल भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली असेल. मात्र
वाहनांसाठी एकदा फास्टॅग घेतल्यावर त्याचा नियमितपणे रिचार्ज करून प्रत्येक वेळी वापर होईल याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. असे झाले तरच ही नवी पद्धत
स्थायी स्वरूपात वापरात येऊन यशस्वी होईल, असेही या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

‘पीएमओ’चे बारकाईने लक्ष
च्फास्टॅगने टोलवसुली करण्याच्या या योजनेच्या प्रगतीवर पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) बारकाईने लक्ष ठेवून आहे.
च्या नव्या व्यवस्थेमुळे टोलनाक्यांवर वाहनांच्या होणाºया खोळंब्यात यामुळे किती घट झाली आहे याचाही अभ्यास करण्यास ‘पीएमओ’ने रस्ते वाहतूक मंत्रालयास सांगितले आहे.
च्त्यासाठी मंत्रालय सध्या सुमारे संपूर्ण देशभरात विविध शहरांमध्ये १०० टोलप्लाझांची निगराणी करत असून आणखी २०० टोलप्लाझांचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही मंत्रालयास उपलब्ध होत आहे.

भीम अ‍ॅपच्या माध्यमातून करता येणार फास्टॅग रिचार्ज
एनपीसीआयकडून सुविधा उपलब्ध

नवी दिल्ली : भीम अ‍ॅपच्या माध्यमातूनही एनईटीसी फास्टॅग रिचार्ज करण्याची सुविधा आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय झाली आहे.
भीम यूपीआय आधारित मोबाइल अ‍ॅपद्वारे वाहनचालक आता फास्टॅग रिचार्ज करू शकेल. त्यामुळे टोलनाक्यांवर लांबच लांब रांगांमध्ये ताटकळत बसण्याचा प्रसंग त्याला टाळता येईल. भारतामध्ये आॅनलाइन माध्यमातून टोलवसुली करण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन ही प्रणाली बनविण्यात आली आहे. टोलवसुलीमध्ये येणाºया अडचणी व व्यवस्थापनातील त्रुटी या प्रणालीच्या माध्यमातून दूर केल्या जातात. वाहनधारक आता त्यांचे फास्टॅग अकाउंट भीम अ‍ॅपच्या साहाय्याने रिचार्ज करू शकतात, असे एनपीसीआयने एका पत्रकात म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर टोल भरण्यासाठी फास्टॅग १५ डिसेंबरपासून देशभरात सक्तीचे करण्यात आले आहे. वाहनाच्या विंड स्क्रीनवर बसविण्यात येणाºया फास्टॅगद्वारे वाहनधारकाच्या प्रीपेड किंवा बचत खात्यातून टोलची रक्कम वळती केली जाते. त्यामुळे टोल भरण्यासाठी वाहन थांबवून रांगेत उभे राहण्याची व वेळ वाया जाण्याची नामुष्की टळणार आहे.
टोलवसुलीत येणार पारदर्शकता
एनपीसीआयच्या अधिकारी परवीना राय यांनी सांगितले की, एनईटीसी फास्टॅगमुळे टोल भरण्यासाठी वाहनधारकांना उत्तम सुविधा लाभली आहे. त्यामुळे टोलवसुलीतही पारदर्शकता येणार आहे.
 

Web Title: Significant increase in toll coming from Fastag than cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.