नाशिक : नुकत्याच संपत असलेल्या आर्थिक वर्षामध्ये चौधरी यात्रा या पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनीने लक्षणीय कामगिरी केली आहे. पुढील आर्थिक वर्षात कंपनीने ४६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती कंपनीचे चेअरमन चतुर्भुज चौधरी व फायनान्स डायरेक्टर महेंद्रपाल चौधरी यांनी दिली.
कंपनीची तिमाही सर्वसाधारण सभा नुकतीच कैलास मठ, भक्तिधाम येथील सभागृहात संपन्न झाली.त्याप्रसंगी ते बोलत होते.
अष्टविनायक, द्वारका, राजस्थान, हिमाचल दर्शन, सिमला, कुलू-मनाली, द.भारत, केरळ, अंदमान, नेपाळ, दार्जिलिंग, गंगटोक, बद्रिनाथ, केदारनाथ, अमरनाथ, गंगासागर, जगन्नाथपुरी, रामेश्वरम, काशी, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, श्रीलंका, कैलास मानसरोवर आदी यात्रांद्वारे २०२१ पर्यंत ६५,००० यात्रेकरूंना यशस्वी यात्रा करवून १०० कोटींचे व्यावसायिक उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष्यही ठेवल्याचे
चौधरी यांनी सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)
चौधरी यात्रा कंपनीची लक्षणीय कामगिरी
नुकत्याच संपत असलेल्या आर्थिक वर्षामध्ये चौधरी यात्रा या पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनीने लक्षणीय कामगिरी केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 05:08 AM2019-03-09T05:08:46+5:302019-03-09T05:08:52+5:30