Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹६५ चा आयपीओ ₹१३१ वर लिस्ट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना १०१% प्रॉफिट; पैसे दुप्पट

₹६५ चा आयपीओ ₹१३१ वर लिस्ट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना १०१% प्रॉफिट; पैसे दुप्पट

आयपीओची आज शेअर बाजारात दमदार एन्ट्री झाली. कंपनीचे शेअर्स NSE वर लिस्ट झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:50 AM2024-03-19T11:50:13+5:302024-03-19T11:51:38+5:30

आयपीओची आज शेअर बाजारात दमदार एन्ट्री झाली. कंपनीचे शेअर्स NSE वर लिस्ट झाले आहेत.

Signoria Creation IPO Listing rs 65 IPO Lists at rs 131 101 percent profit to investors on first day Double the money nse listing | ₹६५ चा आयपीओ ₹१३१ वर लिस्ट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना १०१% प्रॉफिट; पैसे दुप्पट

₹६५ चा आयपीओ ₹१३१ वर लिस्ट, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना १०१% प्रॉफिट; पैसे दुप्पट

Signoria Creation IPO Listing: सिग्नोरिया क्रिएशन आयपीओची आज शेअर बाजारात दमदार एन्ट्री झाली. कंपनीचे शेअर्स NSE वर लिस्ट झाले आहेत. सिग्नोरिया क्रिएशनचे शेअर्स ₹131 वर लिस्ट झाले, ही किंमत त्याच्या ₹65 च्या इश्यू प्राईजपेक्षा  101 टक्के अधिक प्रीमियम आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले.
 

आयपीओची माहिती
 

हा IPO 12 मार्च रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होता आणि 14 मार्च रोजी बंद झाला होता. त्याची इश्यू प्राईज ₹61 ते ₹65 दरम्यान निश्चित करण्यात आली होती. प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 होती. प्रत्येक लॉट साइजमध्ये 2,000 शेअर्सचा समावेश होता. गुंतवणूकदारांना किमान 2,000 शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावता येणार होती. 
 

आयपीओमध्ये इश्यूतील 50% पेक्षा जास्त शेअर्स क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (QIBs) राखीव होते. 15% नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी (NII) आणि 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव होते. आयपीओ पूर्णपणे 14.28 लाख शेअर्सचा फ्रेश इक्विटी इश्यू होता. याद्वारे कंपनीचे लक्ष्य ₹9.3 कोटी उभारण्याचं होतं.
 

600 पट झालेला सबस्क्राईब 
 

या IPO ला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आयपीओ 600 पेक्षा अधिक पट सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 649.88 पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा 1,290.56 पट आणि क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा हिस्सा 107.56 पट सबस्क्राईब झाला होता.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Signoria Creation IPO Listing rs 65 IPO Lists at rs 131 101 percent profit to investors on first day Double the money nse listing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.