- प्रसाद गो. जोशी
शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन विक्रमांची नोंद केल्यानंतरही गुंतवणुकीचा वाढता कल, देशातील कोरोनाची कमी होणारी रुग्णसंख्या आणि विविध कंपन्यांचे येत असलेले अपेक्षित निकाल यामुळे शेअर बाजारातील तेजी ही दिवाळीपर्यंत तरी कायम राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
बाजाराच्या विक्रमामुळे नफा कमविण्यासाठी काही प्रमाणात विक्री होऊन बाजार थोडा खाली येण्याचाही अंदाज असला तरी हे खाली येणे ही अगदी कमी काळासाठीची घटना असेल. त्यानंतर पुन्हा वर जाणारा आलेख दिसण्याचीच शक्यता आहे.
बाजाराच्या भांडवलमूल्यानेही केला विक्रम
मुंबई शेअर बाजारातील सर्व नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्याने नवीन उच्चांक नोंदविला आहे. गुरुवारी बाजार बंद झाला, त्यावेळी या कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य २,७२,७६,७०४.८६ कोटी रुपये झाले. बाजार भांडवलमूल्य हे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. त्यामध्ये बाजार भांडवलमूल्यामध्ये ६.३९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी केलेली खरेदी आणि देशांतर्गत वित्तसंस्थांकडून बाजारामध्ये विक्री झाल्याचे दिसून आले. परकीय वित्तसंस्थांनी १०३७.३७ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली; मात्र त्याचवेळी देशांतर्गत वित्तसंस्था वाढलेल्या बाजारामुळे ३२८६.९१ कोटी रुपयांची विक्री करून नफा कमविताना दिसून आल्या.
आगामी सप्ताहामध्ये विविध कंपन्यांचे जाहीर होणारे निकाल आणि कोविडच्या रुग्णांची आकडेवारी यावरच बाजाराची दिशा ठरणार आहे. सप्ताहात अन्य काही घडामोडी नसल्याने हेच मुद्दे महत्त्वाचे राहतील.
गतसप्ताहातील स्थिती
निर्देशांक बंद मूल्य बदल
सेन्सेक्स ६१,३०५.९५ १२४६.८९
निफ्टी १८,३३८.५५ ४४३.३५
मिडकॅप २६,६९९.६९ ८६२.३५
स्मॉलकॅप २९,८९३.०६ ५६३.७२
दिवाळीपर्यंत बाजार तेजीतच राहण्याची चिन्हे
बाजाराच्या विक्रमामुळे नफा कमविण्यासाठी काही प्रमाणात विक्री होऊन बाजार थोडा खाली येण्याचाही अंदाज असला तरी हे खाली येणे ही अगदी कमी काळासाठीची घटना असेल. त्यानंतर पुन्हा वर जाणारा आलेख दिसण्याचीच शक्यता आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:21 AM2021-10-18T06:21:05+5:302021-10-18T06:21:31+5:30