Silicon Valley Bank Crisis : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक अडचणीत आली आहे. २००८ नंतर ही सर्वात मोठी बँक बुडली आहे. याचा परिणाम भारतावरही होणार असल्याचे बोललं जातंय. भारतातील अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम होणार आहे. प्रामुख्याने टेक आणि स्टार्टअप विभागात गुंतवणूक करणारी ही बँक भारतातही लक्षणीय गुंतवणूक करते. त्यामुळे याचा परिणाम पुढच्या आठवड्यात शेअर बाजारावर होणार आहे.
अगोदरच हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी सुमहाविरोधात केलेल्या घोटाळ्याच्या आरोपामुळे शेअर मार्केट घसरले होते. आता पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये घसरण होऊ शकते. यूएस नियामकांनी सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यासह, बँकेची २०९ अब्ज डॉलरची एकूण मालमत्ता आणि १७५.४ अब्ज डॉलरच्या एकूण ठेवी जप्त करण्यात आल्या आहेत.
सिलिकॉन व्हॅली बँक बुडण्याचा परिणाम जगभरातील टेक उद्योगाला धक्का बसला आहे. टेक स्टार्टअपपासून युनिकॉर्न आणि SaaS (SaaS-Software as a service) कंपन्यांपर्यंत बसला आहे. भारतीय स्टार्टअप क्षेत्रही याला अपवाद नाही.
Tracxn च्या अहवालानुसार, सिलिकॉन व्हॅली बँकेने भारतातील २१ स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, बँकेने कोणत्या कंपनीत किती डॉलर्स गुंतवले आहेत, याची माहिती उपलब्ध नाही. या भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये एक युनिकॉर्न कंपनी Icertis चा समावेश आहे.
Icertis व्यवसायांना करार व्यवस्थापन सॉफ्टवेअर देते. ही सास कंपनी आहे. सन २०२१ मध्ये, युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त झाला, नंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये सिलिकॉन व्हॅली बँकेकडून गुंतवणूक वाढवली.
सापडला एक हजार वर्षे जुना मौल्यवान खजिना, मोजून थकले लोक, दोन वर्षांनंतर समोर आली आकडेवारी
सिलिकॉन व्हॅली बँकेकडून निधी प्राप्त करणाऱ्या भारतीय कंपन्यांमध्ये ब्लूस्टोन, कारवाले, इनमोबी, पेटीएम, वन९७ कम्युनिकेशन, नॅपटोल आणि पेटीएम मॉल इत्यादींचा समावेश आहे. मात्र, २०११ पासून सिलिकॉन व्हॅली बँकेने भारतात फारशी गुंतवणूक केलेली नाही. पण अनेक भारतीय व्हेंचर कॅपिटलिस्टनी सिलिकॉन व्हॅली बँकेसोबत भागीदारी केली आहे. आता या भारतीय स्टार्टअप्सचे संस्थापक आणि गुंतवणूकदार मालमत्ता हस्तांतरणाबद्दल चिंतेत आहेत. कारण बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते.