Join us  

चिटणवीस सेंटरमध्ये सिल्क इंडिया प्रदर्शनाचा शुभारंभ

By admin | Published: September 04, 2015 9:54 PM

(८ बाय ३)

(८ बाय ३)
चिटणवीस सेंटरमध्ये सिल्क इंडिया प्रदर्शनाचा शुभारंभ
नागपूर : वर्षा ऋतुनंतर सणासुदीचे दिवस सुरू होतात. जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा या सणात सिल्क आणि कॉटनचे पारंपरिक कपडे घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे सिव्हील लाईन्सच्या चिटणवीस सेंटरमधील सिल्क इंडिया प्रदर्शनात विविध राज्यातील विणकरांनी आणि हस्त कारागिरांनी तयार केलेल्या सिल्क साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती, बेडकव्हर उपलब्ध असल्याची माहिती प्रदर्शनाचे सचिव जावेद आलम यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदर्शनात जम्मू कश्मीरच्या सिल्क साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ती, गुजरातच्या पारंपरिक छपाईच्या बंजारा कढाईचे ड्रेस मटेरियल, कुर्ती, राजस्थानच्या ठप्पा छपाईचे ड्रेस मटेरियल, कुर्ती, उत्तर प्रदेशच्या बनारसी सिल्क जामदानी, मध्य प्रदेशच्या वजनाने हल्की असलेल्या चंदेरी, महेश्वरी, बाग प्रिंट सिल्क साड्या, ओडिशाच्या संभलपुरी, विचित्रपुरी सिल्क साड्या, आसामच्या सिल्क साड्या, बिहारच्या पाटलीपुत्र, मगध व भागलपूरच्या कोरा, कोसा, टसर साड्या, कर्नाटकच्या हुबळी, धर्मावरम साड्या उपलब्ध आहेत. समिती हातचरखा आणि हस्तशिल्प विकासासाठी प्रयत्नरत असून विणकर आणि हस्तकारागिरांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे जावेद आलम यांनी सांगितले. प्रदर्शन १४ सप्टेबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८.३० पर्यंत खुले राहणार आहे. (वा. प्र.)
....................