नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या भावात सोमवारी पुन्हा एकदा घसरण झाली. राजधानी दिल्लीत सोने ७0 रुपयांनी उतरून ३0,६८0 रुपये प्रती १0 ग्रॅम झाले. चांदी २४५ रुपयांनी उतरून ४५,८८0 रुपये किलो झाली. जागतिक बाजारातही घसरणीचाच कल राहिला. सिंगापूरमध्ये सोने 0.७ टक्क्यांनी घसरून १,३१३.५७ डॉलर प्रति औंस झाले. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ७0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३0,६८0 रुपये आणि ३0,५३0रुपये प्रती १0 ग्रॅम झाला. शनिवारी सोने २0 रुपयांनी घसरले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १00 रुपयांनी घसरून २३,४00 रुपये झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
चांदी-सोने घसरले
By admin | Published: July 26, 2016 1:48 AM