जळगाव : गेल्या आठवड्यात नवरात्र उत्सव व विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने दरवाढ झालेल्या सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी घसरण झाली. चांदीचे दर दीड हजार रुपयांनी घसरून ६३ हजार रुपये प्रतिकिलोवर आले, तर सोने अडीशे रुपयांनी कमी होऊन ५१ हजार ४०० रुपयांवर स्थिर झाले. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीला मागणी वाढल्याने या दोन्ही धातूंच्या दरात सलग तीन दिवस वाढ झाली होती. मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही धातूंच्या दरात घसरण झाली. विजयादशमी व नवरात्र उत्सवही संपल्याने दर कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोमवारी अमेरिकन डॉलरचे दर काहीसे वधारून ७३.८९ वर पोहोचले, तरीदेखील सोन्या-चांदीचे दर कमी झाले. यात चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घसरण झाली. तर सोन्याचेही दर अडीशे रुपयांनी कमी झाले.
चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घट, सोनेही अडीचशे रुपयांनी उतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 2:20 AM