जळगाव : दोन दिवसांपूर्वी ७८ हजार रुपये प्रतिकिलो अशा उच्चांकी भावावर पोहोचलेल्या चांदीच्या भावात दोन दिवसांत पाच हजारांची घसरण झाली आहे. यामध्ये शुक्रवार, १२ मे रोजी एकाच दिवसातील घसरण तीन हजार २०० रुपये असून, या घसरणीमुळे चांदी ७३ हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे. यासोबतच शुक्रवारी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची घसरण होऊन ते ६१ हजार ४०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे.
वाढीव पेन्शनसाठी नवा फॉर्म्युला; सहमतीसाठी ३ महिन्यांची मुदत
चांदीच्या भावात चढ-उतार होऊन ती सातत्याने ७४ हजार ५०० रुपयांच्याच पुढे होती. १० मे रोजी एकाच दिवसात एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती ७८ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती.
घसरण कशामुळे?
आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांकडून चांदीची विक्री अचानक वाढविण्यात आल्याने तिच्या भावात घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
सोन्यात घसरण कमी
चांदीमध्ये एवढी मोठी घसरण झाली असली तरी सोन्यामध्ये केवळ ४०० रुपयांची घसरण आहे. या घसरणीसह शुक्रवारी सोने ६१ हजार ४०० रुपये प्रतितोळ्यावर आले.