Join us

चांदीचा भाव घसरला; खरेदीमुळे सोने स्थिर

By admin | Published: October 04, 2016 4:08 AM

येथील सराफा बाजारात सोमवारी चांदी ५0 रुपयांनी घसरून ४५,४५0 रुपये किलो झाली. सोने मात्र ३१,२00 रुपये प्रति १0 ग्रॅम असे स्थिर राहिले.

नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोमवारी चांदी ५0 रुपयांनी घसरून ४५,४५0 रुपये किलो झाली. सोने मात्र ३१,२00 रुपये प्रति १0 ग्रॅम असे स्थिर राहिले. जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिला. सिंगापुरात चांदी 0.३९ टक्क्यांनी घसरून १९.0७ डॉलर प्रति औंस झाली. सोने 0.११ टक्क्यांनी घसरून १,३१४.४0 डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत तयार चांदीचा भाव ५0 रुपयांनी घसरून ४५,४५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १२५ रुपयांनी घसरून ४५,६00 रुपये किलो झाला. चांदीचे शिक्के खरेदीसाठी ७७ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७८ हजार रुपये प्रति शेकडा असे स्थिर राहिले. दिल्लीतच ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ३१,२00 रुपये आणि ३१,0५0 रुपये प्रति १0 ग्रॅम असा स्थिर राहिला. शनिवारी सोने ३२५ रुपयांनी उतरले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)