Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदी सलग सहाव्या दिवशी घसरली; सोने स्थिर!

चांदी सलग सहाव्या दिवशी घसरली; सोने स्थिर!

चांदीच्या भावात सोमवारी सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. राजधानी दिल्लीत ३२0 रुपयांच्या घसरणीसह चांदी ३९,५८0 रुपये किलो झाली. याउलट सोन्याचा भाव मात्र स्थिर राहिला.

By admin | Published: May 24, 2016 03:48 AM2016-05-24T03:48:45+5:302016-05-24T03:48:45+5:30

चांदीच्या भावात सोमवारी सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. राजधानी दिल्लीत ३२0 रुपयांच्या घसरणीसह चांदी ३९,५८0 रुपये किलो झाली. याउलट सोन्याचा भाव मात्र स्थिर राहिला.

Silver falls for sixth consecutive day; Gold is stable! | चांदी सलग सहाव्या दिवशी घसरली; सोने स्थिर!

चांदी सलग सहाव्या दिवशी घसरली; सोने स्थिर!

नवी दिल्ली : चांदीच्या भावात सोमवारी सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. राजधानी दिल्लीत ३२0 रुपयांच्या घसरणीसह चांदी ३९,५८0 रुपये किलो झाली. याउलट सोन्याचा भाव मात्र स्थिर राहिला.
दिल्लीतील सराफा बाजारात तयार चांदीचा भाव ३२0 रुपयांच्या घसरणीसह ३९,५८0 रुपये किलो, तर साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ४३५ रुपयांच्या घसरणीसह ३९,४0५ रुपये किलो झाला. चांदीचे शिक्के मात्र खरेदीसाठी ६७ हजार रुपये आणि विक्रीसाठी ६८ हजार रुपये प्रति शेकडा, असे आदल्या दिवशीच्या पातळीवर स्थिर राहिले.
९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव दिल्लीत अनुक्रमे २९,६५0 रुपये आणि २९,५00 रुपये प्रति १0 ग्रॅम राहिला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,१00 रुपये असा स्थिर राहिला. जागतिक बाजारांपैकी प्रमुख बाजार असलेल्या सिंगापुरात सोने 0.१४ टक्क्याच्या घसरणीसह १,२५0.१0 डॉलर प्रति औंस झाले. तसेच चांदी १.0३ टक्क्याच्या घसरणीसह १६.३३ डॉलर प्रति औंस झाली.

Web Title: Silver falls for sixth consecutive day; Gold is stable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.