लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दोन दिवसांपूर्वी पाच हजार ८०० रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात सोमवार, ११ जानेवारी रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन चांदी ६३ हजार रुपये प्रति किलोवर आली.
सोन्याच्याही भावात ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ५०,१०० रुपये प्रति तोळ्यावर आले. कोरोना लसचा ड्राय रन झाल्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरणाच्या हालचाली सुरू असल्याने त्याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असल्याचे सांगितले जात आहे. सोमवार, ४ जानेवारीपासून दोन दिवस चांदीच्या भावात वाढ झाली. मात्र, त्यानंतर ते भाव पुन्हा कमी-कमी होत गेले व शनिवार, दि. ९ रोजी तर एकाच दिवसात चांदीच्या भावात ५,८०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर, सोमवारी चांदीच्या भावात पुन्हा १,५०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदीचे भाव ६४, ५०० रुपयांवरून ६,३०० रुपये प्रति किलोवर आले. सोन्याच्या भावात पुन्हा ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
पाच दिवसात ८,५०० रुपयांनी घसरली चांदी६ जानेवारी रोजी ७१,५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात ७ रोजी १,२०० रुपयांनी घसरण होऊन ती ७०,३०० रुपयांवर आली. त्यानंतर, ९ रोजी ५,८०० रुपयांनी घसरण झाली आणि सोमवारी १,५०० रुपयांनी घसरण झाली व चांदी ६३ हजार रुपयांवर आली. पाच दिवसांत सोन्याचे भाव २,३०० रुपयांनी घसरले. ६ रोजी ५२ हजार ४०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ७ रोजी ८०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१,६०० रुपयांवर आले. ९ रोजी एक हजार रुपयांनी घसरण झाली आणि सोमवारी ५०० रुपयांनी घसरण होऊन सोने ५०,१०० रुपये प्रति तोळ्यावर आले.