जळगाव : सोने-चांदीच्या भावात सलग तिस-या दिवशी घसरण होऊन गुरुवार, २४ सप्टेंबरला चांदीचे भाव तीन हजार रुपयांनी गडगडून ती ५८ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. तीन दिवसात तर चांदीत १० हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोने-चांदीची खरेदी करून त्यांचे भाव अचानक वाढविणे व नंतर पुन्हा विक्रीचा मारा करणे या सट्टेबाजारातील प्रकारामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सुवर्ण बाजार अस्थिर झाला आहे. यात दीड महिन्यांपूर्वी चांदीत झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आता पुन्हा तीन दिवसांपासून चांदीचे भाव पुन्हा दररोज घसरत आहेत.
यात २१ सप्टेंबर रोजी ६८ हजार रुपये प्रति किलोवर असलेल्या चांदीच्या भावात २२ सप्टेंबरला सहा हजार रुपयांनी घसरण होऊन ती ६२ हजार रुपये प्रति किलोवर आली. त्यानंतर २३ रोजी पुन्हा एक हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ६१ हजार रुपयांवर आली आणि गुरुवार, २४ सप्टेंबरला पुन्हा त्यात तीन हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ५८ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात तीन दिवसांपासून घसरण होत असून गुरुवार, २४ सप्टेंबरला सोने २०० रुपयांनी घसरून ते ५० हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
----------------------
सट्टा बाजारातील खरेदी-विक्रीच्या मा-यामुळे सोने-चांदीच्या भावात सातत्याने उतार-चढ होत आहेत. या अस्थिरतेमुळे सुवर्ण व्यावसायिकही चिंतीत आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ बाजार असोसिएशन
चांदी पुन्हा एकदा तीन हजार रुपयांनी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा दर
दीड महिन्यांपूर्वी चांदीत झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आता पुन्हा तीन दिवसांपासून चांदीचे भाव पुन्हा दररोज घसरत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 04:33 PM2020-09-24T16:33:37+5:302020-09-24T16:35:24+5:30