Join us

चांदीत सुधारणा, सोने स्थिर

By admin | Published: October 18, 2016 6:43 AM

जागतिक बाजारातील तेजी आणि औद्योगिक क्षेत्राकडून वाढलेली मागणी या बळावर राजधानी दिल्लीत चांदी ५0 रुपयांनी वाढून ४२,२५0 रुपये किलो झाली.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि औद्योगिक क्षेत्राकडून वाढलेली मागणी या बळावर राजधानी दिल्लीत चांदी ५0 रुपयांनी वाढून ४२,२५0 रुपये किलो झाली. सोने मात्र स्थिर राहिले. सिंगापूर येथील बाजारात चांदी 0.१२ टक्क्यांनी वाढून १७.४0 डॉलर प्रति औंस झाली. सोनेही 0.२४ टक्क्यांनी वाढून १,२५३.५0 डॉलर प्रति औंस झाले. दिल्लीत तयार चांदी ५0 रुपयांनी वाढून ४२,२५0 रुपये किलो झाली. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदीही ३५ रुपयांनी वाढून ४१,८५५ रुपये किलो झाली. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र खरेदीसाठी ७२ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७३ हजार रुपये प्रति शेकडा असा स्थिर राहिला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भावही २४,३00 रुपयांवर स्थिर राहिला.