जळगाव : सोने-चांदीच्या भावात तेजी सुरूच असून, शुक्र वारी एकाच दिवसात चांदीच्या भावात थेट चार हजार रुपयांनी वाढ होऊन ती ७७,५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. तसेच सोन्याच्याही भावात ८०० रुपयांनी वाढ होऊन ते ५७,२०० रुपयांंवर पोहोचले आहे. आवक कमी असताना वायदे बाजार तेजीत असल्याने ही भाववाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या महिन्यापासून सोने-चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात या आठवड्यात दररोज विक्रमी वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसात चांदीच्या भावात थेट १० हजार रुपये प्रतिकिलोने वाढ झाल्याने दर ७७,५०० रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्याही दरामध्ये २३०० रुपयांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी दर ५७,२०० रु पये प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत. कमी असलेली आवक व वायदे बाजारात तेजी असल्याने सोन्या-चांदीमध्ये वाढ होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.