लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दिवाळीच्या काळात मोठी दरवाढ झालेल्या चांदीमध्ये सोमवारी तीन हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे चांदी ६५ हजार रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात २०० रुपयांची घसरण होऊन, सोने ४९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. सट्टा बाजारातील घडामोडींमुळे ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या महिन्याभरापासून सातत्याने सोन्या-चांदीत भाववाढ होत गेली. मात्र, सट्टा बाजारात अचानक दलालांनी चांदीची विक्री वाढविल्याने सोमवारी चांदीत थेट तीन हजार रुपयांची घसरण झाली. सोन्याच्याही भावात २०० रुपयांची घसरण होऊन दर ४९ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. डॉलरचे दर वधारूनही घसरण
एरव्ही अमेरिकन डॉलरचे दर वधारल्यास सोन्या-चांदीचेही भाव वाढतात. मात्र, सोमवारी डॉलरचे दर काहीसे वधारले तरी चांदीत तीन हजार तर सोन्यात २०० रुपयांची घसरण झाली.