Join us

चांदीचे दर ‘चकाकले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2016 4:09 AM

जागतिक बाजारात आणि उद्योगांमधील तेजीच्या वाऱ्यामुळे चांदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोमवारी चांदीचा भाव तब्बल २,१५५ रुपयांनी वाढून ४७,७१५ रुपये किलो झाला असून

नवी दिल्ली : जागतिक बाजारात आणि उद्योगांमधील तेजीच्या वाऱ्यामुळे चांदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोमवारी चांदीचा भाव तब्बल २,१५५ रुपयांनी वाढून ४७,७१५ रुपये किलो झाला असून, चांदीच्या भावाचा हा २८ महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. यंदा १ जानेवारीपासून चांदीच्या भावात ४४ टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, सोन्याच्या भावात १00 रुपयांची वाढ झाली आहे. त्याबरोबर सोने ३0,६५0 रुपये तोळा झाले आहे. सूत्रांनी ससांगितले की, ब्रिटनने युरोपीय संघामधून बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केल्यानंतर जागतिक बाजारात चांदीची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जागितक बाजारात चांदीचा भाव २१ डॉलरच्या वर पोहोचला आहे. याशिवाय अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरचा दर घसरल्यानेही परिणामही मौल्यवान धातूची मागणी वाढली आहे. स्थानिक पातळीवरही खरेदी जोरात राहिली.सिंगापूर येथील बाजारात चांदी ७ टक्क्यांनी वाढून २१.१३ डॉलर प्रति औंस झाली. सोने १.२ टक्क्यांनी वाढून १,३५७.६३ डॉलर प्रति औंस झाली. हा दोन वर्षांपेक्षा जास्त काळातील उच्चांकी भाव ठरला आहे. राजधानी दिल्लीत चांदीच्या भावात सलग सहाव्या सत्रात वाढ झाली आहे. तयार चांदी २,१५५ रुपयांच्या वाढीसह ४७,७१५ रुपये किलो झाली. ५ मार्च २0१४ नंतरचा हा उच्चांक आहे. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १,६00 रुपयांनी वाढून ४६,८00 रुपये किलो झाला आहे. चांदीच्या शिक्क्यांचा भाव २,000 रुपयांनी वाढून खरेदीसाठी ७६ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७७ हजार रुपये प्रति शेकडा झाला आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)सोन्याच्या भावात १00 रुपयांची वाढदिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १00 रुपयांनी वाढून ३0,६५0 रुपये आणि ३0,५00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,४00 रुपये असा स्थिर राहिला. सोने-चांदीच्या मागणीत आणखी वाढ होईल, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून दिल्लीत चांदीचा भाव ४७ हजारांच्या वर गेला. - राकेश आनंद, ज्वेलर