जळगाव : गेल्या आठवड्यात घसरण होत असलेल्या चांदीच्या दरात सोमवार, 2 रोजी दीड हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी 62 हजार 500 रुपये प्रतिकिलोवर पोहचली. तसेच सोन्याच्याही दरात 400 रुपयांनी वाढ होऊन ते 51 हजार 400रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत.
गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू होती. मात्र सोमवारी डाॅलरचे दर वधारून 74.47 रुपयांवर पोहोचल्याने सोने-चांदीच्याही दरात वाढ झाली. 26ऑक्टोबर रोजी चांदीच्या दरात दीड हजाराने घसरण होऊन ती 63 हजारांवर तर त्यानंतर पुन्हा 29 रोजी दोन हजाराने घसरण होऊन 61 हजार रुपयांवर आली
होती.
मात्र सोमवारी बाजार उघडताच चांदीच्या दरात दीड हजार रुपयांनी वाढ होऊन ती 62 हजार 500 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. अशाच प्रकारे 26 ऑक्टोबर रोजी सोने 250 रुपयांनी घसरून 51 हजार 400 रुपये व त्यानंतर पुन्हा 400 रुपयांनी घसरण होऊन सोने 51 हजार रुपये प्रतितोळ्यावर आले होते.
चांदीच्या दरात दीड हजाराने वाढ, जाणून घ्या प्रतिकिलो दर
Silver price : गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू होती. मात्र सोमवारी डाॅलरचे दर वधारून 74.47 रुपयांवर पोहोचल्याने सोने-चांदीच्याही दरात वाढ झाली.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 01:03 AM2020-11-03T01:03:39+5:302020-11-03T01:04:00+5:30