Join us

सोन्यापेक्षा चांदीच्या दरात मोठी वाढ! एका आठवड्यात सोन्यापेक्षा चांदीचा दर १३ पटीने वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 11:04 AM

गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५८,७२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर चांदी ७३,६९५ रुपये प्रतिकिलो दराने बंद झाला.

सोन्या-चांदीचे दर नेहमी बदलत असतात. या आठवड्यात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली. मात्र या काळात चांदीच्या दराने सोन्याच्या दरापेक्षा अधिक वेगाने झेप घेतली आहे. या आठवड्यात सोने २४९ रुपये प्रति १० ग्रॅमने महागले आहे. तर चांदीचा भाव प्रति किलो ३,२४८ रुपयांवर पोहोचला आहे. या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव ५८,६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला. तर चांदी ७३,६९५ रुपये प्रति किलोवर बंद झाली. सोन्याच्या तुलनेत चांदीची तीव्र उडी गेल्या आठवड्यात, १८ ऑगस्ट, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५८,७२० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर चांदी ७३,६९५ रुपये प्रतिकिलो दरावर व्यवहार करत होता. 

पाच दिवसांत चांदी ३,२४८ रुपयांनी महागली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत १३ पटीने वाढ झाली आहे. डॉलर निर्देशांक मजबूत झाल्यानंतर कॉमेक्समध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

आकडेवारीनुसार, सोन्यापेक्षा चांदीचा भाव अधिक मजबूत होईल. जर आपण गुणोत्तर पाहिल्यास, चांदीचे प्रमाण सध्या ७९.३१ च्या आसपास आहे, जे दर्शविते की सोने प्रति औंस सुमारे १९१४.६० डॉलर आणि चांदी सुमारे २४.१४ डॉलर प्रति औंस आहे. चांदीच्या दरात सोन्याच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. 

टॅग्स :सोनं