जळगाव : कोरोना विषाणूचा परिणाम वाढत असल्याचा परिणाम रोजच्या रोज सोने-चांदीच्या भावावरही होत असून, त्यांचे भाव गडगडत आहे. मंगळवारी चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४२ हजार ५०० रुपयांवरून ४० हजार रुपये प्रती किलोवर आली. सोन्याच्याही भावात २०० रुपयांनी घसरण ते ४१ हजार ३०० रुपयांवरून ४१ हजार १०० रुपयांवर आले.
कोरोनाची व्याप्ती वाढल्याने सराफ बाजारावरही परिणाम होत असून, औद्योगिक आयात-निर्यात थांबून सोने-चांदीच्या भावात घसरण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच या धातूंची मागणी घटल्याने अमेरिका व इंग्लंडमधून सोने-चांदी निर्यात होणे व इतर देशात त्यांची आयात होण्याचे प्रमाण कमी होत आहे. मागणी घटल्याने त्यांचे भाव कमी होत आहे. चांदीत आज पुन्हा अडीच हजार रुपयांनी घसरण झाली. सोमवारी सकाळी चांदी बाजार ४२ हजार ५०० रुपयांनी उघडला होता. दिवसभर भाव स्थिर राहून चांदीच्या भावात आज अडीच हजारांची घसरण झाली.
चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण
मंगळवारी चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४२ हजार ५०० रुपयांवरून ४० हजार रुपये प्रती किलोवर आली.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:47 AM2020-03-18T05:47:25+5:302020-03-18T05:47:47+5:30