Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदी खरेदीसाठी 'बेस्ट टाइम'! दिवाळीपूर्वी गुंतवणूक केल्यास होईल फायदा, जाणून द्या आजचा दर

चांदी खरेदीसाठी 'बेस्ट टाइम'! दिवाळीपूर्वी गुंतवणूक केल्यास होईल फायदा, जाणून द्या आजचा दर

Silver price today : दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 04:04 PM2020-10-23T16:04:04+5:302020-10-23T16:04:42+5:30

Silver price today : दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली.

silver rate dips today on 23 october this diwali buy silver perfect time to invest earn money | चांदी खरेदीसाठी 'बेस्ट टाइम'! दिवाळीपूर्वी गुंतवणूक केल्यास होईल फायदा, जाणून द्या आजचा दर

चांदी खरेदीसाठी 'बेस्ट टाइम'! दिवाळीपूर्वी गुंतवणूक केल्यास होईल फायदा, जाणून द्या आजचा दर

Highlightsसध्या चांदी ६२-६३ हजारांच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

नवी दिल्ली : बाजार उघडताच चांदीच्या दरात ४३ रुपयांनी वाढ झाली. मात्र, अर्ध्या तासात ५० रुपयांहून अधिक दरात घसरण झाल्याचे पाहायला  मिळाले. गेल्या काही काळात चांदीच्या दरात तेजी दिसून येत होती. ऑगस्ट महिन्यात चांदीचा दर ७७ हजार रुपयापर्यंत पोहोचला होता. उच्च पातळीवरून आता चांदी १५ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदी ६२-६३ हजारांच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचा दर ९५ रुपयांनी घसरून ५१, ४०५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मागील सत्रात सोन्याचा बंद दर ५१, ५०० रुपये होता. चांदीही ५०४ रुपयांनी घसरून ६३,४२५ रुपये प्रतिकिलोवर आली. मागील सत्रात चांदीच्या बंद दर ६३,९२९ रुपये होता.

चांदीच्या दरात घट
आज एमसीएक्सवर ४ डिसेंबर डिलिव्हरीची चांदी ४३ रुपयांनी घसरून ६२,६५८ रुपये प्रतिकिलो दिसून आली. गुरुवारी हा दर ६२,६५८ च्या पातळीवर बंद झाला होता. सकाळी ९.५५ वाजता तेजी दिसत होती. पण, त्याचवेळी चांदी ५५ रुपयांच्या घसरणीसोबत ६२,५६० रुपये प्रतिकिलो ट्रेड करत होती. आतापर्यंत यामध्ये ७३० लॉटचा व्यापार झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात यावेळी किंचित वाढ दिसून येत आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमच्या वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, सकाळी १० वाजता २० डिसेंबरला डिलीव्हरी चांदी यावेली ०.०२४ डॉलरच्या तेजीसोबत २४.७३ डॉलर प्रति औंस स्तरावर ट्रेड करत होता. गुरुवारी यात घसरण होताना २४.७० डॉलर प्रति औंसच्या स्तरावर बंदी झाला.

रुपया वाढला, कच्च्या तेलाच्या किंमतीत घट
सकाळी दहा वाजता सेन्सेक्स १७२ अंकांच्या वाढीसह ४०७३१ च्या स्तरावर ट्रेड करत होता. यावेळी रुपया १० पैशांच्या तेजीसोबत ७३.६३ रुपये प्रति डॉलर स्तरावर ट्रेड करत आहे. तसेत, एमसीएक्सवर यावेळी कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण दिसून आली. १९ नोव्हेंबरला कच्च्या तेलाच्या किंमतीत ५ रुपयांची घट होऊन २९९३  रुपये प्रति बॅरलच्या स्तरावर ट्रेड करत आहे. आतापर्यंत यामध्ये ११२९ लॉटचा व्यापार झाला आहे.
 

Web Title: silver rate dips today on 23 october this diwali buy silver perfect time to invest earn money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.