Join us

चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 5:51 PM

चांदीचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीच्या दरात तेजी दिसून आली. चांदीचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 

सोन्यानंतर आता चांदीच्या दरानेही विक्रम नोंदवला आहे. चांदी आता ऑल टाइम हायवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोन्याचा दरही एप्रिल  महिन्यात 73596 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅम, अशा उच्चांकावर पोहोचला होता. चांदीचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीच्या दरात तेजी दिसून आली. चांदीचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 

MCX वर एक नजर  -मल्‍टी कमोड‍िटी एक्‍सचेंजवर (MCX) शुक्रवारी सकाळच्या सुमारास सोने घसरणीसह खुले झाल्याचे बघायला मिळाले. मात्र यानंतर यात तेजी दिसून आली. दुपारच्या वेळी ते 20 रुपयांच्या तेजीसह ट्रेंड करताना दिसले. दुसरीकडे चांदीच्या दरात आज तेजी दिसून आली. चांदी 300 रुपयांसह 87600 रुपये प्रत‍ि किलोवर ट्रेंड करत होती. व्यवहाराच्या सत्रादरम्यान ती 87784 रुपयांपर्यंतही पोहोचली. सकाळी व्यवहाराच्या सुरुवातीला चांदीने 200 रुपयांनी घसरून सुरुवात केली होती. 

IBJA च्या वेबसाइटवर एक नजर - सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहे. IBJA वेबसाइटनुसार, शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 51 रुपयांनी घसरून 73387 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. 23 कॅरेट सोन्याचा दर 73093 रुपये, तर 22 कॅरेटचे सोन्याचा दर 67223 रुपये प्रत‍ि 10 ग्रॅमवर आला आहे. चांदीच्या दरात तेजी बघायला मिळाली. चांदीचा दर जवळपास 41 रुपयांनी वाढून 86271 रुपयांवर ट्रेंड करत आहे. सध्या चांदीचा दर आपल्या ऑल टाइम हायवर पोहोचलेला आहे. 

टॅग्स :चांदीसोनंगुंतवणूक