Join us

चांदी १२००, तर सोने १०० रुपयांनी वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 5:34 AM

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार सुरू आहे.

जळगाव : सोने-चांदीच्या भावातील चढ-उतार सुरूच असून शनिवारी चांदीच्या भावात एकाच दिवसात १,२०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ७३ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. तसेच सोन्याच्याही भावात १०० रुपयांची वाढ होऊन ते ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार सुरू आहे.

२ नोव्हेंबर रोजी ९०० रुपयांची वाढ होऊन चांदी ७२ हजार ५०० रुपयांवर पोहोचली, मात्र ३ रोजी ७०० रुपयांची घसरण होऊन ती ७१ हजार ८०० रुपयांवर आली. त्यानंतर शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी त्यात एकाच दिवसात थेट १ हजार २०० रुपयांची वाढ झाली व चांदी ७३ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. दुसरीकडे सोन्याच्या भावात तीन दिवसांपासून दररोज १०० रुपयांची वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी सोने ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

टॅग्स :सोनंचांदीव्यवसाय