Lokmat Money > बिझनेस न्यूज > SIM Card: सरकार मोठा निर्णय घेणार? आता एका व्यक्तीला ९ सिमकार्डही मिळणार नाहीत; पाहा काय म्हटलं

SIM Card: सरकार मोठा निर्णय घेणार? आता एका व्यक्तीला ९ सिमकार्डही मिळणार नाहीत; पाहा काय म्हटलं

पाहा आता तुम्हाला किती सिम कार्ड घेता येऊ शकतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 04:15 PM2023-05-02T16:15:25+5:302023-05-02T16:15:49+5:30

पाहा आता तुम्हाला किती सिम कार्ड घेता येऊ शकतील?

SIM Card The government s big decision Now a person will not even get 9 SIM cards cyber fraud telecom trai | SIM Card: सरकार मोठा निर्णय घेणार? आता एका व्यक्तीला ९ सिमकार्डही मिळणार नाहीत; पाहा काय म्हटलं

SIM Card: सरकार मोठा निर्णय घेणार? आता एका व्यक्तीला ९ सिमकार्डही मिळणार नाहीत; पाहा काय म्हटलं

भारत झपाट्याने डिजिटल होत आहे. पण डिजिटल इंडियाच्या मार्गात सायबर फसवणूक हा एक मोठा अडथळा आहे. सायबर फसवणूक ही बहुतांशी बनावट सिमकार्डद्वारे केली जाते. नावट सिमकार्डमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारनं कठोर निर्णय घेतलेत. यासाठी सरकार नवीन मार्गदर्शक तत्त्वंही आणत आहे. या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सरकार एका आयडीवर आता केवळ ४ सिम देण्याची योजना आखली जात आहे. 

आतापर्यंत एका आयडीवर ९ सिम जारी केले जात होते. मात्र आता यात बदल होण्याची शक्यता आहे. आता सरकार एका आयडीवर जारी होणाऱ्या सिमची संख्या कमी करणार आहे. रिपोर्ट्सनुसार दूरसंचार विभाग एका आयडीवर सिम कार्ड जारी करण्यासाठी त्याची संख्या निश्चित करण्यावर काम करत आहे. या संदर्भात या आठवड्यात दूरसंचार विभागाकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारनं एका आयडीवर सिम कार्डच्या संख्येत कपात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, सरकारने २०२१ मध्ये सिम कार्डची संख्या ९ पर्यंत कमी केली होती.

सिमची माहिती मिळणार
तुम्हाला तुमच्या आयडीवर जारी केलेल्या सिम कार्डची कमाल संख्या जाणून घ्यायची असेल, तर तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. यापूर्वी असा नियम होता की तुमच्या आयडीवर कोणतेही बनावट सिम नोंदणीकृत असल्यास त्याची तक्रार करता येईल, त्यानंतर हे बनावट सिम ब्लॉक करण्यात येत होतं.

 

Web Title: SIM Card The government s big decision Now a person will not even get 9 SIM cards cyber fraud telecom trai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.