Lokmat Money > बिझनेस न्यूज > सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना सोपी

सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना सोपी

बहुप्रतीक्षित सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना अत्यंत सोपी राहणार असल्याचे वृत्त आहे, तसेच जून-जुलैपासून आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

By admin | Published: May 11, 2016 03:19 AM2016-05-11T03:19:46+5:302016-05-11T03:19:46+5:30

बहुप्रतीक्षित सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना अत्यंत सोपी राहणार असल्याचे वृत्त आहे, तसेच जून-जुलैपासून आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

Simplifying the pay structure of Seventh Pay Commission | सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना सोपी

सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना सोपी

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना अत्यंत सोपी राहणार असल्याचे वृत्त आहे, तसेच जून-जुलैपासून आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सातव्या वेतन आयोगाची रचना एकपदरी असणार आहे. आतापर्यंतच्या वेतन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे ती दुपदरी नसेल. दुपदरी रचनेत एक ‘पे बँड’ असतो, तसेच त्याच्या जोडीला ‘पे ग्रेड’ असतो. ही रचना सातव्या वेतन आयोगाने टाळली आहे.
त्याऐवजी वेतनात एकच बँड असेल. सातव्या आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे.

Web Title: Simplifying the pay structure of Seventh Pay Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.