Join us

एकाच फोनमध्ये सहज वापरा 2 व्हॉट्सअॅप

By admin | Published: September 19, 2016 12:04 PM

जर तुमच्याकडे दोन नंबर असतील तर दोन्ही नंबरवर व्हॉट्सअॅप वापरावं असं तुम्हाला साहजिकच वाटत असणार

ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.19- अॅन्ड्रॉइड फोन वापरणा-यांना आपल्या फोनमध्ये अनेक फिचर्स आहेत हे तर माहित आहे. मात्र आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण काय काय करू शकतो हे अनेकांना ठाऊक नाही.
 
अनेकांचे एका पेक्षा जास्त इ-मेल अकाउंट किंवा सोशल मीडिया अकाउंट्स असतात. जर तुमच्याकडे दोन नंबर असतील आणि दोन्ही नंबर तुम्ही एकाच फोनमध्ये वापरत असाल तर दोन्ही नंबरवर व्हॉट्सअॅप वापरावं असं तुम्हाला साहजिकच वाटत असणार. सामान्यपणे एकाच फोनवर तुम्ही दोन व्हॉट्सअॅप अकाउंट नाही वापरू शकत, मात्र यासाठी एक मार्ग आहे.
 
यासाठी तुम्हाला प्ले स्टोरमध्ये जाऊन पॅरेलल स्पेस (Parallel Space ) हे अॅप डाउनलोड करावं लागेल.  पॅरेलल स्पेस एकाच फोनमध्ये मल्टीपल अकाउंट वापरण्याची सुविधा देतं.
 
हे अॅप डाउनलोड केल्यावर फेसबुक,व्हॉट्सअॅप किंवा ट्विटरसारख्या अॅप्सपैकी कोणत्या अॅप्सचं दुसरं अकाउंट तुम्हाला वापरायचं आहे ते सिलेक्ट करावं. पॅरेलल स्पेसला पासवर्ड देवून सुरक्षितही ठेवता येतं. मात्र, जर तुमच्याकडील फोनमध्ये 3 जीबी रॅम असेल तरच हे अॅप योग्यपणे काम करेल.