नवी दिल्ली : व्हिसाच्या बाबतीत सध्या अमेरिकेकडे लक्ष केंद्रित झालेले असतानाच, आता सिंगापूरमध्ये काम करणाऱ्या भारतीय आयटी व्यावसायिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांनाच नोकरीच्या संधी देण्याचे स्पष्ट करतानाच, सिंगापूरने भारतीय आयटी व्यावसायिकांचे व्हिसा रोखले आहेत.
येथील काही कंपन्या आता दुसऱ्या देशाचा पर्याय शोधत आहेत. एचसीएल व टीसीएस सिंगापूरमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर, इन्फोसिस, विप्रो, एल अँड टी इन्फोटेक यांचेही सिंगापूरमध्ये व्यवसाय आहेत. व्यापक आर्थिक सहकार्य कराराची (सीईसीए) समीक्षाही येथील सरकारने थांबविली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>व्यवसायात विदेशी नकोत
सिंगापूरमध्ये आता इकॉनॉमिक नीड टेस्टवर भर दिला जात आहे. या माध्यमातून भारतीयांना रोजगार देण्यापासून रोखता येऊ शकते. व्यापक आर्थिक सहकार्य करारानुसार ज्या सेवांबाबत करार आहेत, त्यात कोटा नसेल. विदेशी व्यावसायिकांना सिंगापुरात व्यवसाय करण्यासाठी अलीकडे प्रचंड विरोध होत आहे.
सिंगापुरात विदेशी आयटी व्यावसायिकांना व्हिसा नाही
सिंगापूरमध्ये काम करणाऱ्या भारतीय आयटी व्यावसायिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे
By admin | Published: April 4, 2017 04:53 AM2017-04-04T04:53:43+5:302017-04-04T04:53:43+5:30