लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून ‘भारतपे’चे अडचणीत सापडलेले सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांना सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवादातून कोणताही दिलासा मिळाला नाही. सिंगापूर इंटरनॅशनल सेंटरने अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळून लावली आहे.
ग्रोव्हर यांनी एसआयएसीमध्ये याचिका दाखल करत बोर्डाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशनीर ग्रोव्हर यांची याचिका फेटाळल्यानंतर ‘भारतपे’चे बोर्ड आर्थिक अनियमितता आणि प्रशासनातील त्रुटींची चौकशी करत राहणार आहे. याबाबत अधिक बोलण्यास अशनीर ग्रोव्हर यांनी नकार दिला आहे.