Join us  

एकाच दिवसात चांदी 2500 तर सोने 900 रुपयांनी गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 6:14 AM

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असला, तरी यंदा सोन्या-चांदीचेही भाव कमी-कमी होत असल्याचे उलट चित्र विदेशासह भारतातही दिसत आहे.

जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असला, तरी यंदा सोन्या-चांदीचेही भाव कमी-कमी होत असल्याचे उलट चित्र विदेशासह भारतातही दिसत आहे. यामुळे सराफा बाजारात अस्थिरता आहे. शनिवारी एकाच दिवसात जळगावात सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी घसरण होऊन ते ४२ हजार १०० रुपये प्रती तोळ्यावर आले. चांदीतही कधी नव्हे, ती एकाच दिवसात अडीच हजार रुपये प्रती किलोने घसरण होऊन चांदी ४७ हजार ५०० रुपयांवरून ४५ हजार रुपये प्रती किलोवर आली.>यंदा चित्र उलटेचअमेरिका, युरोपियन देशांच्या सराफा बाजारावर भारतीय बाजारातील सोन्या-चांदीचे भाव अवलंबून असतात. त्यामुळे एरव्ही अमेरिकन डॉलर वधारल्यास भारतीय रुपयात घसरण होऊन भारतात या धातूंचे भाव वाढतात. मात्र, सध्या याउलट चित्र आहे.>आठवड्यात चढ-उतारसोनेही अस्थिर आहे. डॉलर घसरत असताना सोन्याचा भाव सोमवारी ४३ हजार ८०० रुपये होता. मंगळवारी दर ४३ हजार २०० रुपयांवर आला. बुधवारी पुन्हा ४०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर, दोन दिवसांत थोडी-फार वाढ होत असताना, आज ९०० रुपये प्रती तोळ्याने घसरण होऊन ते एकदम सोने ४२ हजार १०० रुपयांवर आले.>डॉलर ७२.१८ रुपयांवरगेल्या पंधरा दिवसांपासून रुपयाची घसरण सुरूच आहे. शनिवारी एका डॉलरचे मूल्य ७२.१८ रुपयांवर पोहोचले. त्यामुळे सोन्याचे दर वाढणार अशी शक्यता होती. मात्र, सोन्या-चांदीत घसरणच होत आहे.दोन आठवड्यांपासून वाढ होत गेलेल्या चांदीचे ४९ हजार रुपये प्रती किलोवर पोहोचले. २६ फेब्रुवारीपर्यंत ती ४९ हजार रुपयांवर स्थिर राहिली.मात्र, २७ रोजी त्यात थेट दीड हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ४७ हजार ५०० रुपयांवर आली. शुक्रवारी त्याच भावावर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात आज तब्बल अडीच हजार रुपयांनी घसरण झाली. चांदीत घसरण होत आहे.

टॅग्स :सोनं