Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशभर सोन्याचा एकच दर, सराफ व्यावसायिक लवकरच निर्णय घेणार

देशभर सोन्याचा एकच दर, सराफ व्यावसायिक लवकरच निर्णय घेणार

gold price : दागिन्यांच्या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अनेक ज्वेलर्स हे कर भरत नाहीत आणि त्यामुळे ते कमी किमतीत दागिने विकतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:09 AM2020-11-02T05:09:43+5:302020-11-02T05:10:06+5:30

gold price : दागिन्यांच्या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अनेक ज्वेलर्स हे कर भरत नाहीत आणि त्यामुळे ते कमी किमतीत दागिने विकतात. 

A single gold price across the country, the bullion trader will decide soon | देशभर सोन्याचा एकच दर, सराफ व्यावसायिक लवकरच निर्णय घेणार

देशभर सोन्याचा एकच दर, सराफ व्यावसायिक लवकरच निर्णय घेणार

नवी दिल्ली : सोन्याचा भाव संपूर्ण देशभर एकसारखा असावा, अशी मागणी होत आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने देशात सगळ्या स्टोअर्समध्ये सोन्याचा एकच भाव ठेवला आहे. इतरही सराफ व्यावसायिकांनीही हाच मार्ग वापरण्याचे नियोजन केल्याचे समजते. सोन्याची सर्वांत जास्त आयात होते ती भारतात. या आयात सोन्याची देशभर किमतही जवळपास एकसारखीच असते. तरीही देशभरातील वेगवेगळ्या ज्वेलर्स असोसिएशनकडून अलंकार, दागिन्यांचे भाव वेगवेगळे निश्चित केले गेले आहेत.
२९ ऑक्टोबर रोजी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची किंमत १० ग्रॅमसाठी ४९,१०० रुपये इतकी होती. केरळमध्ये ती ४६,८५० रुपये, मुंबईत ४९,६८० रुपये आणि चेन्नईत ४७,३८० रुपये होती.  
दागिन्यांच्या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, अनेक ज्वेलर्स हे कर भरत नाहीत आणि त्यामुळे ते कमी किमतीत दागिने विकतात. 

Web Title: A single gold price across the country, the bullion trader will decide soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं